Love Jihad Invistigation | ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांचा तपास गतीने व्हावा!

Vishwa Hindu Parishad Letter | विश्व हिंदू परिषदेचे सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकांना निवेदन
Love Jihad Invistigation
विश्व हिंदू परिषद सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन समाज संघटितपणे व एकोप्याने राहत असताना लव्ह जिहादसारख्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. आचरा, मालवण व अन्य याठिकाणी याबाबत गुन्हेही दाखल झाले. मात्र, गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई दिसून येते. पोलिस तपासात गतिमानता दिसून येत नाही. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही गतिमान पद्धतीने करावी. आरोपीना कठोर शिक्षा होण्यासाठी कार्यवाही व्हावी अशी भूमिका विश्व हिंदू परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे करण्यात आली आहे.

विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री संतोष प्रभू यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले, अशी माहिती विश्व हिंदू परिषद पदाधिकारी विलास हडकर, भाऊ सामंत यांनी मालवण येथे दिली आहे.

Love Jihad Invistigation
Malvan News | नांदोस जंगलमय भागात आढळली मानवी मृतदेहाची हाडे

या निवेदनात म्हटले आहे, राष्ट्रदोही शक्तींकडून सार्वभौम राष्ट्राला आव्हान देणार्‍या अनेक योजना आखल्या जातात. त्याची माहिती शासनाकडून अनेकवेळा प्रसारित केली जाते. मुस्लिम समाजातील काही अपप्रवृत्तीकडून लव्ह जिहाद, लँड जिहाद, व्यापार जिहाद, व्होट जिहाद, याची रचना सर्वदूर लक्षात येत आहे. मालवण तालुक्यातील आचरे पोलिस ठाणे अंतर्गत दाखल गुन्ह्यामध्ये तसेच मालवण पोलिस ठाणे अंतर्गत काही दिवसापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये काही स्थानिक मुस्लिम व्यक्तींकडून या घटना घडल्याचे निदर्शनास येते. मात्र या गुन्ह्यांचा अपेक्षित तपास झालेले दिसत नाही.

Love Jihad Invistigation
Sindhudurg News| सिंधुदुर्ग कन्येचा गुन्हेगारी कमी करण्याचा निर्धार

या घटना समाज सुलभतेच्या द़ृष्टीने चिंता निर्माण करणार्‍या आहेत. या सर्व प्रकरणांमधून समाजात पोिलिस यंत्रणांविषयी अविश्वासाचे वातावरण आहे. या गुन्ह्याच्या तपासात जर दिरंगाई झाली असेल तर यापुढे योग्य ती कारवाई व्हावी. तसेच दाखल गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आनंद प्रभू, विलास हडकर, राजू राऊळ, लवू महाडेश्वर, भाऊ सामंत, बाळू देसाई, आप्पा लुडबे, मंदार सरजोशी, शिल्पा खोत, अ‍ॅड समीर गवाणकर, चिन्मय रानडे, अनिकेत फाटक, गणेश चव्हाण, हरेश पडते, सुभाष पुराणिक, रविकिरण तोरसकर, संदीप बोडवे, श्रीराज बादेकर, शांती तोंडवळकर, रत्नाकर कोळंबकर, साईराज नार्वेकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news