Malvan News | नांदोस जंगलमय भागात आढळली मानवी मृतदेहाची हाडे

Identity Card Found Near Remains | पोलिसांकडून कसून तपास ; मृतदेहाजवळ सापडले ओळखपत्र
Malvan News
नांदोस जंगलमय भागात आढळली मानवी मृतदेहाची हाडे(File Photo)
Published on
Updated on

मालवण : मालवण तालुक्यातील नांदोस -सुतारवाडीच्या जवळील जंगलमय भागात शनिवारी सकाळी पुरुष जातीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मालवण पोलीसांनी व फॉरेन्सिक तपासणी विभागाने या मृतदेहाची पाहणी करून हाडांचे अवशेष ताब्यात घेतले आहेत.

या मृतदेहाजवळ सापडलेल्या ओळखपत्रावरून सदर मृतदेह प्रदीप सिंह थापा नामक नेपाळी युवकाचा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून तो कट्टा येथे चायनीज सेंटर मध्ये होता कामाला होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मालवण तालुक्यातील नांदोस सुतारवाडी येथील जंगलात छोट्या वडाच्या झाडाखाली अज्ञात व्यक्तीचा सडलेला मृतदेह आढळून आला. स्थानिक शेतकर्‍यांना हा मृतदेह दिसून आला. शेतकर्‍यांनी इतर ग्रामस्थांना माहिती दिली. याविषयी पोलीसांना माहिती दिल्यावर मालवणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी सहकार्‍यांसमवेत त्याठिकाणी धाव घेतली.

Malvan News
Malvan News | मालवणात उतरला 'मोठा जलरंक'

पोलिसांनी या मृतदेहाची पाहणी केली. त्याठिकाणी मृतदेहाची केवळ हाडे दिसून आली. ज्याठिकाणी हा मृतदेह सापडला त्याठिकाणच्या झाडाला एक साधी दोरी लटकलेली दिसून आली. तर हाडांच्या बाजूला निळ्या काळसर रंगाची ट्रॅक पॅन्ट, पांढर्‍या रंगाची चप्पल, टीशर्ट, मोबाईल, घड्याळ पडलेले दिसून आले. तसेच ओळखपत्र व काही नोटा सापडून आल्या. हा मृतदेह 30 दिवसापूर्वीचा असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

Malvan News
Sindhudurg : ग्राहकांकडून प्रश्नांचा भडीमार तर अभियत्यांचे मौन!

सिंधुदुर्गनगरी येथील फॉरेन्सिक विभागाल पाचारण करण्यात आला. त्यांनी हाडांची पाहणी करून सर्व अवशेष ताब्यात घेतले. तसेच मृतदेहाशेजारी सापडलेल्या वस्तूही ताब्यात घेतल्या आहेत. पोलीस निरीक्षक मारुती जगताप, उपनिरीक्षक संदीप खाडे, पोलीस प्रकाश मोरे, एस. आय मुल्ला, फॉरेन्सिक टीमचे प्रशांत मागाडे, संतोष सावंत, अमित तेली व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news