

Meta Keywords (in English):, , Thunderstorm Incident, Maharashtra Weather, Lightning Accident, Property Loss, Local News, Monsoon Hazards, Weather Alert, Natural Disaster
Meta Slug (in English with space):
मणेरी : विजेचा लोळ कोसळल्याने तुटलेली फरशी.
दोडामार्ग : मणेरी-धनगरवाडी येथे विठ्ठल शाम गावडे यांच्या घरावर विजेचा लोळ कोसळल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र विद्युत उपकरणांसह घराचे मोठे नुकसान झाले. मणेरी परिसरात सोमवारी सायंकाळी मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट सुरू होता. मध्यरात्री विजेचा प्रचंड लोळ विठ्ठल गावडे यांच्या घरातील बाथरूमच्या खिडकीतून आत घुसला. या आघातामुळे बाथरूममधील फरशी फुटल्या.
तसेच भिंतीचा काही भाग कोसळून पडला. विजेच्या तीव्रतेमुळे घरातील टीव्ही, रेफ्रिजरेटर, पंखा यांसह इतर विद्युत उपकरणे जळून खाक झाली. याघटनेवेळी विठ्ठल गावडे व त्यांची पत्नी घरातच झोपले होते. दैव बलवत्तर म्हणून दोघेही या भयावह प्रसंगातून बचावले. घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.