Land Dispute Violence | जमीन वादातून आईच्या डोक्यावर दगडाने वार

वडील, भावालाही धक्काबुकी : हरकुळ बुद्रुकमधील युवकावर गुन्हा
Land Dispute Violence
जमीन वादातून आईच्या डोक्यावर दगडाने वारPudhari File Photo
Published on
Updated on

कणकवली : घर बांधण्यासाठी जमीन देत नसल्याच्या रागातून मुलाने आईला शिवगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन डोक्यावर दगड फेकून मारला. यात आई संगीता सुरेश तायशेटे (रा. हरकुळ बु., कावलेवाडी) या गंभीर जखमी झाल्या. हा प्रकार मंगळवारी रात्री 8 वा. च्या सुमारास घडला. विशेष म्हणजे मुलगा मंगेश सुरेश तायशेटे (मूळ रा. हरकुळ बु., सध्या रा. फोंडाघाट) याने चक्क पोलिसांच्या उपस्थितीतच ही मारहाण केली. याप्रकरणी संगीता यांचे पती सुरेश केशव तायशेटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगेश याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मंगेश हा कामानिमित्त पत्नी व मुलांसोबत फोंडाघाट येथे भाडयाने राहतो. घर बांधण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून तो वडिलांकडे जमिनीची मागणी करीत आहे. ही जमीन देण्याबाबत सुरेश हे पत्नी व मोठा मुलागा श्रेयस यांना घेऊन कणकवली तहसील कार्यालयात मंगळवारी आले होते.

Land Dispute Violence
Kankavali Market News | कणकवली बाजारपेठेत अतिक्रमणे; पोलिस, मुख्याधिकार्‍यांची संयुक्त पाहणी

तेथे दाखल मंगेश याला जमिनी देण्याबाबतचा बाँडपेपर त्यांनी वाचायला दिला व त्यात काही बदल करायचा असल्यास सांगायला सांगितले. मात्र, मंगेश याने आई संगीता, वडिल सुरेश, भाऊ श्रेयश यांना जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुकी केली. परिणामी सुरेश यांनी पोलिस ठाणे गाठून मंगेश याच्याविरोधात तक्रार दिली.

याच रागातून मंगेश याने पोलिस ठाणे गाठून भावाच्या गाडीच्या टायरमधील हवा काढली. त्यामुळे घाबरलेल्या सुरेश यांनी आपल्यासह पत्नी, मुलगा यांना घरी सोडण्याची पोलिसांना विनंती केली. त्यानुसार पोलिस तिघांना घरी सोडायला आले होते. मात्र, घरी असलेला मंगेश हा कोयता घेऊन आई, वडील, भावाच्या अंगावर धावला. पोलिसांनी त्याला रोखले खरे. मात्र, त्यानंतर मंगेश याने आई संगीता हिच्यावर डोक्यावर मधोमध मोठा दगड मारला. त्यात संगीता या गंभीर जखमी झाल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मंगेश याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सुनील वेंगुर्लेकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news