

देवगड : श्री देव कुणकेश्वर देवस्थानचा पारंपरिक दादरा वार्षिक सोहळा शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. या वार्षिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दु.3 ते रात्री 8 वा. पर्यंत कुणकेश्वर मंदिर परिसर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
या काळात कुणकेश्वर मारुती मंदिर, कुणकेश्वर महापुरुष पार (बाजारपेठ), तारामुंबरी बीच आदी परिसरातून कुणकेश्वर मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग बंद राहतील, अशी माहिती देवस्थान ट्रस्टकडून देण्यात आली. तसेच शनिवार 23 ऑगस्ट रोजी सायं. 6 ते रात्री 10 वा. या वेळेत भावई वार्षिक सोहळा होणार असून या काळातही मंदिरातील दर्शन व्यवस्था बंद राहील. याची भाविकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी केले आहे.