Plastic Ban Kudal | रस्त्यावर कचरा टाकाल, प्लास्टिक पिशव्या वापराल तर कारवाई अटळ!

Kudal Municipality Action | कुडाळ न.पं. प्रशासनाचा इशारा, फिरते विक्रेत्यांसह नागरिकांमध्ये जनजागृती; कारवाईसाठी विशेष पथक तैनात
Plastic Ban Kudal
कुडाळ : शहरात बुधवारी आठवडा बाजारा दिवशी जनजागृतीपर मोहीम राबविताना न.पं.चे पथक.(Pudhari Photo)
Published on
Updated on

Waste Management

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत प्रशासनाकडून बुधवार आठवडा बाजारादिवशी शहरात फिरते भाजी, फळ विक्रेत्यांमध्ये प्लास्टिक बंदी आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीपर मोहीम राबविण्यात आली. प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग) चा वापर टाळावा, कचरा न. पं. घंटा गाडीवर द्यावा, अशा सूचना फिरत्या विक्रेत्यांना करण्यात आल्या. ग्राहक व नागरिकांनीही प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करून कापडी पिशव्यांचा वापर करावा. या आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने विक्रेत्यांसह नागरिकांना दिला आहे.

नगरपंचायत प्रशासनामार्फत प्लास्टिक बंदीबाबत प्रभावीपणे शहरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंतर्गत व्यापारी, व्यावसायिक, फिरत्या विक्रेत्यांमध्ये जनजागृती करून, न.पं.ला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरीही काही फिरत्या विक्रेत्यांकडून छुप्या पद्धतीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे न.पं. प्रशासनाने याविरोधात कडक भूमिका घेतली आहे. आठवडा बाजारादिवशी पोस्ट ऑफीस चौक ते जिजामाता चौक दरम्यान मुख्य रस्त्यालगत दुकाने थाटणारर्‍या फिरत्या भाजी विक्रेत्यांकडून बाजार संपल्यानंतर तेथे टाकाऊ कचरा टाकला जात असल्याचा प्रकार गेल्या बुधवारी समोर आला होता. याची दखल नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर आणि नगरपंचायत प्रशासनाने घेत, कडक कारवाईची मोहीम हाती घेतली. यासाठी न.पं.ने विशेष पथक तैनात केले आहे.

Plastic Ban Kudal
Kudal News | शालेय साहित्य खरेदीबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकार्‍यांचा आदेश लागू करा

नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर आणि मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या मार्गदर्शनाखाली न.पं. प्रशासकीय अधिकारी राजू पठाण, कर व मिळकत विभाग प्रमुख नीलेश म्हाडेश्वर, लिपिक गजानन पेडणेकर, मुकादम दीपक कदम, रोहित परब, गोट्या कोरगावकर, केतन पवार, सतीश जाधव, साहिल कुडाळकर यांच्या पथकाने बुधवारी शहरात याबाबत जनजागृती मोहीम राबविली.

यावेळी काही फिरत्या भाजी विक्रेत्यांकडे प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. त्या जप्त करण्यात आल्या. या पुढे प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करावा, बाजार संपल्यानंतर टाकाऊ कचरा रस्त्यालगत न टाकता तात्काळ न.पं.च्या घंटागाड्यांवर द्यावा. यासाठी नक्षत्र टॉवर समोर एक आणि पोस्ट ऑफीस समोर एक अशा दोन घंटागाड्या बुधवार आठवडा बाजारादिवशी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. टाकाऊ कचरा जागीच टाकल्यास तसेच प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा न.पं. प्रशासनाकडून देण्यात आला. ध्वनिक्षेपकाद्वारे प्लास्टिक बंदीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

Plastic Ban Kudal
Kudal News | शालेय साहित्य खरेदीबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकार्‍यांचा आदेश लागू करा

कुडाळ शहर ‘स्वच्छ व सुंदर’ बनविणार

कुडाळ शहर स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. त्यासाठी प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी कटाक्षाने करण्यात येत आहे. टाकाऊ कचर्‍याबाबतही न.पं.ने कडक पावले उचलली आहेत. प्लास्टिक बंदीबाबत विक्रेत्यांसह नागरिकांनी न.पं.ला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news