Kudal Crime News : निरुखे सुतारवाडीत मध्यरात्री छापा, ३ बंदुकांसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त, संशयित ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई​
Kudal Crime News
Kudal Crime News : निरुखे सुतारवाडीत मध्यरात्री छापा, ३ बंदुकांसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त, संशयित ताब्यात file photo
Published on
Updated on

Kudal: Midnight Raid in Nirukhe Sutarwadi; Contraband Worth ₹1.25 Lakhs, Including 3 Guns, Seized; Suspect Detained

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा

कुडाळ तालुक्यातील निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीररील्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धाड टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत ३ तयार बंदुका, ६ बॅरल आणि बंदूक बनविण्याचे साहित्य असा एकूण १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी जगन्नाथ शंकर मेस्त्री (वय ६५, रा. निरुखे सुतारवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Kudal Crime News
Beed Crime News | अंबाजोगाईत हॉटेलवर पोलिसांचा छापा; 'तिर्रट' जुगाराचा डाव उधळला, ६ जणांना अटक

​जिल्ह्यात 'ऑल आऊट ऑपरेशन' अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक कुडाळ परिसरात गस्त घालत असताना, निरुखे सुतारवाडी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध अग्निशस्त्रे तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने २७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास निरुखे येथे छापा टाकला.

​या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून ३ तयार अग्निशस्त्रे, बंदुकीचे ४ लाकडी बट, ६ लोखंडी बॅरल आणि शस्त्रे तयार करण्यासाठी लागणारे वेल्डिंग मशीन, ग्राइंडर व इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी संशयित जगन्नाथ मेस्त्री याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३, ५ व २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​

Kudal Crime News
Beed Crime : डोळ्यात चटणी टाकून सोनाराला लुटणारी टोळी जेरबंद

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सुधीर सावंत, हवालदार सदानंद राणे, डॉमिनिक डिसोजा, प्रकाश कदम, राजेंद्र गोसावी, रूपाली खानोलकर, विल्सन डिसोजा, आशिष जामदार, जॅक्सन घोंसाळविस व महेश्वर समजिस्कर यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध शस्त्रे बनविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news