

कुडाळ : अतिवृष्टीने तालुक्यात पडझडीच्या घटना घडून नुकसान झाले. यात पांग्रड येथे गणेश गोविंद पांग्रडकर यांच्या मांगरवर सागाचे झाड पडले. त्यामुळे सिमेंटचे पत्रे, कोणे व अन्य वस्तूंचे मिळून 30 हजार रू. चे नुकसान झाले.
कुडाळ येथे परशुराम वामन मेस्त्री यांच्या लाकूड गिरणीच्या शेडवर झाड पडून नुकसान झाले. सोनवडे तर्फ हवेली येथील सुरेश पुरुषोत्तम आसोळकर यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले.
अणाव-वेशीवाडी येथील प्रभावती परब यांच्या घराचे पत्रे वादळी वार्याने उडून 11 हजारांचे नुकसान झाल्याची माहीती कुडाळ तहसील कार्यालयातून देण्यात आली.