

कुडाळ : अमली पदार्थ विरोधी मोहीम राबविताना पाट हायस्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 150 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. इयत्ता पाचवी ते सातवी प्राथमिक गटात अर्जुन कुंभार, माध्यमिक गटात अंकुर मेथर व उच्च माध्यमिक गटात ऋग्वेद कांबळी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन निवती पोलिस ठाण्यात भरवण्यात आले होते.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल आणि निवती पोलिस स्टेशनच्या वतीने अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.
या अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तीन स्तरावर ही स्पर्धा घेण्यात आली. यामधील प्रत्येक गटातील प्रथम पाच निवडक चित्रांना निवती पोलीस स्टेशन तर्फे पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्याकडून बक्षीस देण्यात आली. निवडक 50 चित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आहे. कलाशिक्षक संदीप साळस्कर यांच्या सहकार्याने 50 फूट बाय 30 फूट एवढ्या मोठ्या भिंतीवर एका वृक्षाची रचना करून त्याला चित्र लटकवलेली आहेत.
नशा मुक्ती वॉल अगदी मुख्य बैठकीच्या ठिकाणी केल्यामुळे लक्षवेधी ठरत आहे. संस्था कार्याध्यक्ष विजय ठाकूर, मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, कलाशिक्षक संदीप साळसकर, समीर शिर्के, तानाजी काळे आदी उपस्थित होते.
इ.5 वी ते 7 वी- प्रथम अर्जुन कुंभार, द्वितीय यश राऊत, तृतीय धनिषा परब, चौथा भार्गवी केसरकर आणि पाचवा युगा कानडे. माध्यमिक गट-प्रथम अंकुर मेथर, द्वितीय दिशा सामंत, तृतीय अथर्व शेगले, चौथा अथर्व म्हापणकर, पाचवा धनदा सावंत. उच्च माध्यमिक गट-प्रथम ऋग्वेद कांबळी, द्वितीय जीवन गोसावी आणि तृतीय प्रतीक मेथर. या सर्व विद्यार्थ्यांचे पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. संस्था कार्याध्यक्ष विजय ठाकूर, मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, कलाशिक्षक संदीप साळसकर, समीर शिर्के, तानाजी काळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.