Kudal Illegal Sand Storage | कुडाळ तालुक्यातील 17 ब्रास अवैध वाळू साठा जप्त

महसूल व पोलिसांच्या भरारी पथकाची संयुक्त कारवाई : एकावर गुन्हा
Kudal Illegal Sand Storage
कुडाळ तालुक्यातील 17 ब्रास अवैध वाळू साठा(Pudhari File Photo)
Published on
Updated on

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील सोनवडेतर्फ हवेली, मठवाडी ता. कुडाळ येथील मठ संस्थान परिसरामध्ये वाळू संबंधित महसुल व पोलीस यांच्या भरारी पथकाने 17 ब्रास अवैद्य वाळुचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी बाबाजी सखाराम मांजरेकर (35, रा. सोनवडे तर्फ हवेली) याने विनापरवानगी वाळू उत्खनन करून अवैद्य वाळु साठा केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी 4 वा. केली.

या घटनेची फिर्याद कुडाळ मंडळ अधिकारी प्रशांत दत्तात्रय मसुरकर, यांनी कुडाळ पोलीसात दिली. उपविभागीय अधिकारी कुडाळ यांच्या आदेशाअन्वये गौणखनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक व अवैद्य वाळू साठा वर कारवाई करणेकरीता सरबंळ व सोनवडे या गावातील अवैद्यवाळु साठा यावर कारवाई करण्यासाठी कुडाळ तहसील कार्यालयाचे भरारी पथक नेमण्यात आले होते.

Kudal Illegal Sand Storage
Kudal crime | वाळूमाफियांची मुजोरी: कुडाळात महसूल पथकाच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न; बनावट नंबर प्लेटचा वापर

सोमवार 25 रोजी दु. 3 वाजता भरारी पथक प्रमुख महसुल नायब तहसीलदार अमरसिंग जाधव, ए.आर. राणे , व्ही. एन. पास्ते, एस.बी. परब, सहा. पोलीस फौजदार श्री.चव्हाण व महिला पोलिस नाईक सुजाता तेंडोलकर यांचे पथक सरंबळ व सोनवडे तर्फ हवेली या गावातील वाळू साठा तपासणी गेले होते.सायं 4 वा. सोनवडे तर्फ हवेली, मठवाडी येथील मठ संस्थान परिसरामध्ये पाहणी करत असता रस्त्यालगतच्या जागेत सुमारे 17 ब्रास अनधिकृत वाळु साठा आढळुन आला.

Kudal Illegal Sand Storage
Kudal Narali Pournima Rally | कुडाळातील नारळीपौर्णिमा रॅलीचा वाद मिटला!

त्याठीकाणी बाबाजी सखाराम मांजरेकर यांनी येवुन सदर वाळु आपल्या मालकीची असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्याकडे वाळू साठ्याचा परवाना नसल्याचे दिसून आले. सदर वाळु ही सोनवडे तर्फ हवेली येथील कर्ली नदी पात्रातुन उपसा केल्याची कबुली त्याने दिली. पथकातील अधिकार्‍यांनी पंचयादी घालुन हा वाळू साठा जप्त केला व तो . सोनवडे पोलिस पाटील स्वप्निल धनाजी परब यांचे ताब्यात देण्यात आला., अशी माहिती कुडाळ पोलिसानी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news