Kharif Season 2025-26 | खरीप हंगाम 2025-26 साठी राज्यस्तरीय भात व नाचणी पीकस्पर्धा जाहीर

Innovative Farming Practices | राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकर्‍यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते.
Kharif Season crop competition
Kharif Season(Pudhari File Photo)
Published on
Updated on

ओरोस : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकर्‍यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकर्‍यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकर्‍यांचे योगदान मिळेल.

मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकर्‍यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी पीकस्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.

Kharif Season crop competition
ओरोस येथील बेकायदेशीर इमारतीवर हातोडा; महामार्ग प्राधिकरणाची कारवाई

त्यानुषंगाने अन्नधान्य,भात, नाचणी (रागी) पीकस्पर्धा सन 2025- 26 साठी राज्यस्तरावरुन कृषी विभागामार्फत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आल्या असून त्यांच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकर्‍यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकर्‍यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत खरीप हंगामातील पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार असून, तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरांवर स्पर्धकांची निवड होणार आहे.

पीकस्पर्धेतील पिके : खरीप पिके:- भात, नाचणी (रागी), अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख: खरीप हंगाम: भात, नाचणी (रागी), 31 ऑगस्ट 2025

Kharif Season crop competition
Sindhudurg News | सिंधुकन्येच्या खांद्यावर जिल्ह्याच्या सुरक्षेची धुरा

सहभागी शेतकर्‍यांना अशी मिळणार बक्षिसे

सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकर्‍यांसाठी तालुका, जिल्हा, व राज्य पातळीवरील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे, तालुका पातळी- पहिले- 5 हजार, दुसरे- 3 हजार व तिसरे 2 हजार, जिल्हा पातळी- पहिले- 10 हजार, दुसरे- 7हजार व तिसरे 5 हजार, राज्य पातळी - पहिले- 50 हजार, दुसरे- 40हजार व तिसरे 30 हजार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news