

कणकवली : कणकवली बाजारपेठेत न. पं. प्रशासनाकडून गुरुवारी रात्री रस्त्यावर लाईनआऊट करण्यात आली. ही लाईन आऊट व्यापारी व घरांच्या उंबर्यापर्यंत केल्याने व्यापारी व न. पं. अधिकारी व कर्मचार्यामध्ये शुक्रवारी वांदग झाला. लाईऑऊटच्या विषयावर नगर अभियंता सचिन नेरकर यांनी या लाईनच्या आत दुकाने लावावीत असे सांगितले. यावर व्यापार्यांनी केलेल्या प्रश्नावर श्री. नेरकर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व्यापारी व अभियंता श्री. नेरकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अखेर माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर व प्रसाद अंधारी यांनी मध्यस्थी केल्याने या वादावर पडदा पडला.
गणेशोत्सवात शहरात वाहतूक कोंडी व ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष दालनात पोलीस, व्यापारी, भाजी, फळ, फुले विक्रेत्यांच्या यांची बैठक झाली होती. त्यावेळी बाजारपेठ रस्त्यावर लाईनआऊट करण्याचा निर्णय घेत त्याबाबत नियमावली तयार करण्यात आली. त्यानुसार बुधवारी रात्री न. पं. कर्मचार्यांनी बुधवारी रात्री बाजारपेठ रस्त्यालगत लाईनआऊट केली. ही लाईनआऊट काही दुकाने तसेच काही घरांच्या उंबर्यापर्यंत केली गेली.
याबाबत गुरुवारी सकाळी व्यापारी व घरमालकांनी न. पं. अभियंता सचिन नेरकर यांना विचारणा केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून व्यापारी व त्यांच्यात वादंग झाला. गतवर्षी पेक्षा यंदा न. पं.ने रस्त्यापासून खूप आत लाईनआऊट केल्याची बाब व्यापार्यांनी सचिन नेरकर यांच्या निदर्शनास आणून दिली. यावरून व्यापारी व श्री.नेरकर यांच्या शब्दीक बाचबाची झाली. त्यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
तत्पूर्वी न. पं. कर्मचार्यांनी लाईनआऊटच्या बाहेर अतिक्रमण केलेल्या व्यापार्यांना साहित्य हटविण्यास भाग पाडले. दरम्यान माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर व माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांनी मध्यस्थी करत व्यापारी व सचिन नेरकर यांच्या चर्चासोबत चर्चा केली. न. पं. प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी दुरध्वनीद्वारे श्री. पारकर यांनी चर्चा केली. त्यानंतर नगर अभियंता सचिन नेरकर यांनी नरमाईची भूमिका घेतल्याने या वादावर पडदा पडला.
गतवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील रस्त्याच्या पांढर्या लाईनच्या आत मध्ये आपली आस्थापने लावावीत असे बजावले गेले. रस्त्यालगत बसणारे व्यावसायिकांनी देखील आपण आपली आस्थापने आपण दिलेल्या हद्दीतच लावली जातील, असा विश्वास दिला. या मोहिमेत प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, नगरपंचायतचे कर्मचारी प्रशांत राणे, रवी म्हाडेश्वर, संतोष राणे आदी सहभागी झाले होते.