Illegal Sand Transportation | अवैध वाळू वाहतूक; डंपर मालकाला 1 लाख 63 हजारांचा दंड

Illegal sand transportation
वाळू वाहतूक करणारा हा डंपर महसूल विभागाने जप्त करून आणला.Pudhari Photo
Published on
Updated on

दोडामार्ग : अवैध वाळू वाहतूक करणार्‍या एका डंपरवर महसूल विभागाने कसई येथे कारवाई केली. त्याला तब्बल 1 लाख 63 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. मागील दहा दिवसांत वाळू वाहतूक करणार्‍या तीन डंपरवर या विभागाने कारवाई केली. मात्र स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात होणार्‍या खडी वाहतुकीवर या विभागाची कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

हा डंपर सोमवारी रात्री 10 वा.च्या सुमारास वाळू घेऊन बांदा ते कसई-दोडामार्ग जात होता. यावेळी झोळंबेचे तलाठी श्रीराज सांबारी यांनी डंपर तपासणीसाठी थांबविला व चालकाकडे वाळू वाहतूक पासबद्दल विचारणा केली. मात्र चालकाकडे वाळू वाहतूक पास नसल्यामुळे त्यांनी तो डंपर तहसील कार्यालयात आणला. दोडामार्ग तहसीलदारांनी वाळूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी डंपर मालकाला 1 लाख 63 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

काळा दगड वाहतूक करणार्‍यांवर कारवाई का नाही?

अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाईसाठी महसूल विभागाचे भरारी पथक तैनात असल्याचे तहसीलदार राहुल गुरव यांनी सांगितले. मात्र अलीकडच्या काही दिवसांत झालेल्या कारवाईवरून हे पथक केवळ वाळू वाहतुकीवर कारवाई करत असल्याचे दिसून येते. तालुक्यात मोठ्या प्रमाणात काळ्या दगडांची अवैध वाहतूक होते.

शिवाय ही वाहतूक तहसील कार्यालया समोरून व महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून दिवसरात्र केली जाते. यापैकी एका डंपरवर दहा दिवसांपूर्वी महसूलने कारवाई केली होती. त्यानंतर लागलीच सायंकाळी तात्काळ तहसील कार्यालयात गौण खनिज व्यावसायिकांची एक बैठक झाली. त्यानंतर मात्र या भरारी पथकाने अद्याप दगड वाहतूक करणार्‍या कोणत्याही वाहनावर कारवाई केलेली नाही. त्या बैठकीत नेमके असे काय घडलेे? हे मात्र गुलदस्त्यात आहे.

Illegal sand transportation
Sindhudurg News : सोळाशे पोलीस अधिकाऱ्यांची टीडब्ल्यूजेमध्ये गुंतवणूक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news