Illegal Sand Mining Action | अवैध वाळू उपशाविरोधात महसूल विभाग आक्रमक

कवठी- चेंदवण येथील 8, तर बांदीवडेतील 7 रॅम्प जमीनदोस्त; कुडाळ महसूलची आठवडाभरात दुसरी कारवाई
Illegal Sand Mining Action
चेंदवण येथील जमीनदोस्त केलेले रॅम्प (Pudhari File Photo)
Published on
Updated on

कुडाळ/ मसुरे : जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खननाविरोधात महसूल प्रशासनाने आक्रमक कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी व शनिवारी मालवण व कुडाळ तालुका महसूलच्या विशेष पथकांनी बांदिवडे व कवठी-चेंदवण येथील नदीपात्रात धडक देत तेथील वाळू रॅम्प जेसीबीच्या मदतीने जमीनदोस्त केले. यामध्ये बांदीवडे येथील 7, तर कवठी-चेंदवण येथील 8 रॅम्पचा समावेश आहे. या कारवाईने अनधिकृत वाळू उपसा करणार्‍यांना चांगलाच दणका बसला आहे.

कुडाळ तालुक्यातील कवठी व चेंदवण परिसरात कर्ली नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर कुडाळ महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी धडक देत तेथील वाळू उत्खनानासाठी उभारलेले 8 रॅम्प जमीनदोस्त केले. आठवडाभरात कुडाळ महसूलची दुसरी कारवाई झाल्याने वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

चेंदवण व कवठी वाळू पट्यात अवैध वाळू उत्खनन होत असल्याची माहिती महसूल विभागाला प्राप्त झाली होती. त्याची दखल घेत कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळी पथकाने ही कारवाई केली. निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, वालावल मंडळ अधिकारी श्वेता दळवी, ग्राम महसूल अधिकारी भरत नेरकर, सोनाली मयेकर, स्नेहल सागरे, शिवदास राठोड उपस्थित होते. कुडाळ महसूलच्या या पथकाने चेंदवण येथील 6 वाळूचे रॅम्प तर कवठी येथील 2 वाळूचे रॅम्प जेसीबीच्या मदतीने उद्ध्वस्त केले.

Illegal Sand Mining Action
Kudal Narali Pournima Rally | कुडाळात नारळी पौर्णिमेनिमित्त मिरवणूक रॅलीत प्रत्येकी एकच रिक्षा!

अवैध वाळू पट्ट्यात विशेष पथके!

तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी कुडाळ तालुक्यातील वाळू पट्ट्यात बेकायदा वाळू उत्खनन थांबविण्यासाठी परिसरात गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत. या वाळू पट्ट्यात पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी विशेष पथके तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती कुडाळचे नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांनी दिली.

Illegal Sand Mining Action
Anti-liquor Protest Kudal | अधिकार्‍यांच्या टेबलवर ठेवली दारूच्या बाटल्यांची माळ!

बांदिवडे-कालावल खाडीतही धडक कारवाई

मसुरे : कालावल खाडी किनार्‍यालगत बांदिवडे येथील वाळूचे अनधिकृत सात रॅम्प महसूल विभागाच्या टीमने शुक्रवारी सायंकाळी उशिरा जेसीबीच्या मदतीने पूर्णपणे उद्ध्वस्त केले. मालवणच्या प्रभारी तहसीलदार प्रिया हर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागातील कर्मचार्‍यांनी आणि अधिकार्‍यांनी ही कारवाई केली.

कालावल खाडीच्या बांदिवडे गावा लगत हे वाळू उपसा करण्यासाठी रॅम्प बनविण्यात आले होते. याची माहिती मिळताच मालवण तहसीलच्या पथकाने त्या ठिकाणी जात ही कारवाई केली. प्रभारीतहसीलदार प्रिया हर्णे, मसुरे मंडल अधिकारी डी. व्ही. शिंगरे, श्रावण मंडळ अधिकारी एस. आर. चव्हाण, पेंडूर मंडल अधिकारी अजय परब, पोईप मंडळ अधिकार संतोष गुरखे, कोळंब मंडळ अधिकारी मीनल चव्हाण, सुकळवाड मंडळ अधिकारी एस. एस. जंगले, देऊळवाडा ग्राम महसूल अधिकारी संतोष जाधव, बेलाचीवाडी ग्राम महसूल अधिकारी श्री. भागवत, मसुरे ग्रामसेवक सचिन चव्हाण, ग्रामसेविका वर्षा रामाने आदींच्या पथकाने ही कारवाई केली. बंदर अधिकारी आणि मालवण पोलिसांनीही यासाठी सहकार्य केले.

Illegal Sand Mining Action
Sindhudurg Politics | मित्र पक्षाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्या!

यापुढे या भागामध्ये अनधिकृत वाळूचा उपसा केल्यास संबधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मसुरे मंडळ अधिकारी डी. व्ही. शिंगरे यांनी दिला. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे या परिसरामध्ये अनधिकृत रेती उपसा करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news