

मालवण : राज्याचे मत्स्यद्योग तथा बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी ही महादेवाची भूमी आहे. आमच्या हिंदू राष्ट्रात आय लव्ह महादेवच चालणार असा नारा दिला.
यानंतर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आय लव्ह महादेवचे बॅनर तसेच अनेकांच्या सोशल मीडियावर आय लव महादेवचे स्टेटस दिसून आले. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कट्टा बाजारपेठ येथे हिंदू प्रेमींनी हिंदू राष्ट्राच्या प्रेमापोटी व नितेश राणे यांनी केलेल्या विधानाच्या समर्थनार्थ आय लव्ह महादेवचा बॅनर लावला.
कट्टा बाजारपेठेत ग्रामपंचायत कार्यालय नजीक बॅनर लावल्याने अनेकांच्या नजरा या बॅनरकडे वळतात. काही युवकांनी या बॅनरकडे उभे राहून सेल्फी काढले. अचानक लागलेल्या बॅनरमुळे बाजारपेठेत रंगतदार चर्चा सुरू आहेत.