सिंधुदुर्ग: पत्नीवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी पतीला ५ वर्षे कारावासाची शिक्षा

Sindhudurg Crime News | मालवण तालुक्यातील पराड येथील घटना
husband attacks wife,  5 years imprisonment
आरोपी अशोक राजाराम शिंगरे याला ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. Pudhari Photo
Published on
Updated on

ओरोस; पुढारी वृत्तसेवा: पत्नीवर खुनी हल्ला केल्याच्या आरोपाखाली मालवण तालुक्यातील पराड येथील आरोपी अशोक राजाराम शिंगरे (वय ६२) याला ५ वर्ष सश्रम कारावास, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास अशी शिक्षा आज (दि. ५) सुनावण्यात आली. हा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सानिका जोशी यांनी दिला. (Sindhudurg Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ४ नोव्हेंबर २०१८ रोजी रात्री ११. वाजता गुन्ह्यातील पीडित महिला आरोपीची पत्नी) ही तिचे दैनंदिन काम आटोपून अंथरुणावर झोपण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी अशोक राजाराम शिंगरे (वय ६२ रा. पराड, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडणतंटा करुन लोखंडी पाईपने मारहाण केली व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

त्यानुसार आरोपीच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरुन मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास मालवण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

खटल्याचे न्यायालयीन कामकाज अभियोग पक्षामार्फत अॅड. रुपेश देसाई, सरकारी अभियोक्ता, सिंधुदुर्ग यांनी पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, अनुराधा कोळी यांनी काम पाहिले.

husband attacks wife,  5 years imprisonment
सिंधुदुर्ग : किनळे येथील अंगणवाडी सेविकेचा दागिन्यांसाठीच खून

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news