

देवगड : या वर्षी प्रतिकुल हवामानामुळे फळांचा राजा 'हापूस' संकटात सापडला. सहजिकच यामुळे बागायतदार व व्यापारी यांच्यावर आस्मानी संकट कोसळले. मुळात आंब्याचे उत्पादन १० ते १५ टक्केच आले. दुसरीकडे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजारपेठेत दाखल झाला. आंब्याचे उत्पादन कमी असल्याने यावर्षी हापूस विक्रीचे दर गतवर्षीच्या तुलेनेत ३०० ते ५०० रुपये वधारले आहेत, अशी माहिती आंबा बागायतदार विद्याधर जोशी यांनी दिली. सध्या स्थानिक बाजारपेठेत आंब्याचा दर ७०० ते १ हजार रुपये प्रतिडझनी असून, १५ मेपर्यंत बाजारपेठेत आंबा असेल, अशी शक्यता स्थानिक आंबा विक्रेते सदा बाणे यांनी व्यक्त केली.
यावर्षीचा हापूस आंबा हंगाम पूर्णतः नैसर्गिक संकटात सापडला आहे. यावर्षी १५ ते २० टक्केच आंब्याचे उत्पादन झाले आहे, अशी माहिती देवगड येथील आंबा बागायतदार विद्याधर जोशी यांनी दिली. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी हापूस आंबा ३० टक्के महाग आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात तयार हापूस आंबा बागायतदार मुंबई-वाशी मार्केटमध्ये पाठवित होते.
यावर्षी एप्रिल महिन्यात हा आंबा वाशी मार्केटमध्ये दाखल झाला. स्थानिक बाजारपेठेमध्ये तर एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात हापूस आंबा विक्रीसाठी आला. गतवर्षी एका डड़ान हापूसचा दर किमान ५०० रुपये होता. यावर्षी हा दर ७०० ते १ हजार रुपये प्रतिडज्ञान आहे. मुंबई-वाशी मार्केटमध्ये आंब्याचे दर गडगडले असून, हापूस आंबा खरेदी-विक्री करणारे दलाल सध्या कर्नाटकचा आंबा 'देवगड हापूस'च्या नावाखाली विकत आहेत.
वाशी मार्केटमध्ये हापूसच्या ५ डझन पेटीचा दर १८०० रुपये असल्याची माहिती आंबा बागायतदार विद्याधर जोशी यांनी दिली. काही स्थानिक बागायतदार आपल्या बागेतील आंबा थेट पुणे, मुंबई येथे विक्रीसाठी नेत असून, त्यांच्या आंब्याला १२०० ते १५०० रुपये प्रतिडझनी दर मिळत आहे.