Mango-Cashew in Sindhudurg | आंगबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

शासनाला मदतीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश
Mango-Cashew
Mango-Cashew in Sindhudurgpudhari photo
Published on
Updated on

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खराब हवामान, अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे NDRF/SDRF च्या निकषानुसार पंचनामे करून शासनाला मदतीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व आंबा व काजू बागायतदार शेतकरी यांनी आपल्या नुकसानीचे पंचनामे व प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे आवाहन शासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Mango-Cashew
Sindhudurg Nerle Village Strike | नेर्ले गावातील महिलांचे उपोषण अखेर मागे

आंबा व काजू पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आणि मदतीचा लाभ मिळवण्यासाठी सर्व आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी पुढील कागदपत्रे तातडीने ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावयाची आहेत.

त्यामध्ये सर्वसाधारण पंचनामा फॉर्म, आंबा पिकासाठी NDRF/SDRF पंचनामा फॉर्म, काजू पिकासाठी NDRF/SDRF पंचनामा फॉर्म, नवीन 7/12 उतारा (ओरिजनल), स्पष्ट दिसणारे बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स यांचा खाडाखोड न करता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करावयाची आहेत. जेणेकरून मदतीच अहवाल शासनास वेळेत सादर करता येईल. हैं कागदपत्र जमा करण्यासाठी अंतिम मुदत २४ एप्रिल् ठेवण्यात आली आहे.

Mango-Cashew
Sindhudurg Pre-Monsoon Works | मान्सूनपूर्व कामे १५ मेपूर्वी पूर्ण करा

ई-पीक नोंदणीचा अडसर

अनेक शेतकऱ्यांनी आपल्या सातबारावर चालू म्हणले २०२५-२६ वर्षाची ई-पीक पाहणी नोंद केलेली नाही. सातबारावर चालू वर्षांच्या ई-पीक पाहणीमध्ये आंबा, काजू पिकाची नोंद नसल्यास त्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळणे कठीण होणार आहे. अनेक भागात अद्यापही ई-पीक पाहणी झालेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी हे पंचनामे व मदतीसाठीचे प्रस्ताव सादर करू शकणार नसल्याने ते शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची भीती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news