Sindhudurg Road Accident | हडपीड येथे रिक्षा व दुचाकीची धडक; स्वार जागीच ठार

दुसरा स्वार गंभीर; मृत व जखमी कोटकामते गावातील
Sindhudurg Road Accident
विनायक पुजारे pudhari photo
Published on
Updated on

देवगड: देवगड- नांदगाव मार्गावर हडपीड कुलस्वामिनी मंदिरासमोरील अवघड वळणावरील रस्त्यावर विरुद्ध दिशेने जात दुचाकीने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार विनायक धोंडू पुजारे (वय 22, रा. कोटकामते आडिवरेवाडी) हा जागीच ठार झाला. तर दुचाकीवरील त्याचा सहप्रवासी निखिल नारायण नवलू (24, रा. कोटकामते आडिवरेवाडी) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोवा-बांबुळी येथे उपचार सुरू आहेत.

ही घटना बुधवारी मध्यरात्री 1.15 वा. च्या सुमारास घडली. कोळोशी-वरचीवाडी येथील रिक्षाचालक बाळकृष्ण नागोजी खरात हा रिक्षाने बुधवारी मध्यरात्री देवगड ते कोळोशी जात होता. तर कोटकामते-आडिवरेवाडी येथील विनायक पुजारे हा दुचाकीने निखिल नवलू याच्यासमवेत कोटकामते येथे जात होता.

देवगड-नांदगाव मार्गावर हडपीड येथील कुलस्वामिनी मंदिरासमोरील एका अवघड वळणावर भरधाव वेगात असलेल्या विनायक पुजारे याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात समोरुन येणार्‍या रिक्षाला जोरदार धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीस्वार विनायक पुजारे हा जागीच ठार झाला.

त्याच्या मागे बसलेला निखिल नवलू गंभीर जखमी झाला. रिक्षाचालक बाळकृष्ण खरात याला किरकोळ दुखापत झाली. स्थानिक ग्रामस्थांनी मदतकार्य राबवून गंभीर जखमी निखिल नवलू याला उपचारासाठी हलविले. त्याच्यावर गोवा- बांबुळी येथे उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच देवगडचे पोलिस हवालदार गणपती गावडे व योगेश महाले यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. गुरुवारी सकाळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात विनायक पुजारे याच्या मृतदेहाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Sindhudurg Road Accident
Sindhudurg Pinguli Accident Death |पिंगुळी अपघातात गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू

घटनेची फिर्याद रिक्षाचालक बाळकृष्ण खरात यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली आहे. घटनेचा तपास सहा.पोलिस निरीक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत. विनायक पुजारे हा गावात मोलमजुरीची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. बुधवारी संध्याकाळी तो असलदे येथे एका कार्यक्रमाला गेला होता. तेथून घरी माघारी परतताना त्याचा अपघाती मृत्यू झाला. पश्चात आई, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

Sindhudurg Road Accident
Sindhudurg Accident | देवगड-नांदगाव मार्गावर भीषण अपघात : दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news