

मालवण : कुडाळच्या प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे व तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली हडी कोथेवाडा येथील वाळूचे अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेले रॅम्प महसूलच्या पथकाने उद्ध्वस्त केले. ही कारवाई गुरूवारी सायंकाळी करण्यात आली.
कालावल खाडीपट्ट्यालगत वाळू व्यावसायिकांनी अनधिकृतरीत्या रॅम्प उभारले असल्याच्या तक्रारी महसूल विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे व तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी तहसीलदार प्रिया परब, पेंडूर मंडळ अधिकारी अजय परब, आंबेरी मंडळ अधिकारी दीपक शिंगरे, कोळंब मंडळ अधिकारी मीनल चव्हाण, सुकळवाड मंडळ अधिकारी स्वप्निल जंगले, हडी ग्राम महसूल अधिकारी नीलेश वरुडे यांच्या संयुक्त पथकाने हडी-कोथेवाडा येथे जात वाळूचे अनधिकृत रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केले.