

सावंतवाडी : ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात आणि थरारक मानवी मनोरे रचत सावंतवाडी शहरात सुमारे 20 दहीहंड्या फोडण्यात आल्या. अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या गोविंदा पथकाने शहरातील मानाची दहीहंडी फोडत उत्सवाचा श्रीगणेशा केला.
सावंतवाडी शहरातील एकूण 20 दहीहंड्या फोडण्याचा मान या गोविंदा पथकाला मिळाला. विशेष म्हणजे ह्या दही हंड्या अस्मी अमेय तेंडुलकर या बालिकेने दरवर्षीप्रमाणे फोडल्या. हंडीचा थरार अनुभवण्यासाठी शहरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उत्सवाच्या सुरुवातीला सालईवाडा येथील श्री. पडते यांच्या निवासस्थानी असलेल्या श्रीकृष्ण मूर्तीची पूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीने ही मूर्ती शहरातून बाजारपेठेच्या दिशेने नेण्यात आली. सुरुवातीला फिश मार्केट नंतर जयप्रकाश चौक भाजी मार्केट त्यानंतर सावंतवाडी नगर परिषदेची दहीहंडी फोडण्यात आली श्रीराम वाचन मंदिरपासून ते एसटी स्टँड आणि शिवाजी चौक ,गवळी तीठा भटवाडी रोड पासून बाहेरचावाडा या ठिकाणीही दहीहंडी फोडण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान शहरातील चौकाचौकांतील या दहीहंड्या फोडण्यात आल्या.
उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते.
या दहीहंडी उत्सवात अमेय तेंडोलकर मित्र मंडळाचे गोविंदा पथकामध्ये सुमारे 200 गोविंदाने सर्वांमध्ये भाग घेतला होता, शिवाय माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, विनायक ठाकुर,अतुल केसरकर, बाबु कुडतरकर, प्रतिक बांदेकर, सचिन केसरकर,दिनेश जाधव, सनी जाधव, मयुर लाखे, राकेश लाखे, अमित लाखे, संतोष लाखे, अंकुश लाखे, शुभम लाखे, निखिल कांबळे, फयाज मुजावर, अरूण घाडी, रोहित चव्हाण, नंदू ढकरे आदींसह अमेय तेंडोलकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते व सावंतवाडीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.