Devgad Hapus : आंबाप्रेमींसाठी गोड बातमी! देवगड हापूसची पहिली पेटी पुण्याला रवाना

कोकणच्या हापूसची गोड चाहूल! लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर पहिली पेटी पुण्यात
Devgad Hapus
Devgad Hapus : आंबाप्रेमींसाठी गोड बातमी! देवगड हापूसची पहिली पेटी पुण्याला रवानाfile photo
Published on: 
Updated on: 

Good news for mango lovers! The first box of Devgad Hapus left for Pune

देवगड : पुढारी वृत्तसेवा कोकणचा राजा आणि जगभरात अस्सल चव, मोहक सुगंध व दर्जेदार गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या देवगड हापूस आंब्याने यंदाच्या हंगामाची शुभ सुरुवात केली आहे. लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय मुहूर्तावर देवगड येथील वीरेंद्र दत्तात्रय कांबळी तसेच कातवण येथील शेतकरी दिलीप राजाराम तर्फे यांच्या हापूस आंब्याच्या पहिल्या पेट्या पुणे बाजारपेठेसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. हंगामाला अधिकृत सुरुवात होण्यापूर्वीच देवगड हापूसने पुणे मार्केटमध्ये एंट्री केल्याने आंबा उत्पादक व व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.

Devgad Hapus
Ramayana : रामायणच्या निर्मात्‍यांचा कडक इशारा, जर चित्रपट लीक केला तर..

वीरेंद्र कांबळी यांच्या माध्यमातून सहा डझन क्षमतेच्या एकूण तीन पेट्या, तर शेतकरी दिलीप तर्फे यांच्या माध्यमातून पाच डझनची एक आणि साडेपाच डझनच्या तीन पेट्या पुण्याला पाठविण्यात आल्या आहेत. प्रणीत मांजरेकर यांच्या साई आंबा ट्रान्सपोर्टद्वारे या पेट्या पुण्यातील गुलटेकडी मार्केट येथील मे. नामदेव रामचंद्र भोसले (एन.आर.बी., गाळा क्रमांक ९०५/९०६) येथे रवाना करण्यात आल्या आहेत.

हंगामाच्या सुरुवातीलाच हापूसचे उत्पादन घेऊन बाजारपेठेत माल पाठविण्याची किमया वीरेंद्र कांबळी आणि दिलीप तर्फे यांनी साधली आहे. बागेची योग्य निगा, उत्पादनाचे नियोजन आणि अनुकूल परिस्थिती यांच्या जोरावर त्यांनी हंगामापूर्वीच उत्पादन घेण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे त्यांच्या या यशाचे विशेष कौतुक होत आहे.

Devgad Hapus
CM फडणवीसांनी साजरी केली शेतकऱ्यांसोबत दिवाळी; PM मोदींकडून कौतुक

देवगड हापूसची वैशिष्ट्यपूर्ण चव, सुगंध आणि दर्जा यामुळे पुण्यासह देशातील विविध बाजारपेठांमध्ये त्याला विशेष मागणी असते. पुणे ही हापूसची महत्त्वाची बाजारपेठ असल्याने यंदाच्या हंगामातील पहिल्या पेट्यांना व्यापारी वर्गाकडून कसा प्रतिसाद मिळतो आणि किती बाजारभाव मिळतो, याकडे आंबा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर झालेली ही पहिली पाठवणी देवगडच्या आगामी आंबा हंगामाची गोड चाहूल ठरली असून, यंदा शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन आणि समाधानकारक बाजारभाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.