Goa Check Post: गोव्यात जाताय, आधी वाहनांची कागदपत्रे तपासा अन्यथा दंड; पर्यटकांनी काय काळजी घ्यावी?

Goa Check Post | गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर 'हायटेक' नजर; अन्यथा हजारोंचा दंड निश्चित !
Patradevi Check Post
Patradevi Check Post
Published on
Updated on

बांदा : विराज परब

गोव्याला जाताय, जरा थांबा तुम्ही आपला वाहन परवाना, पियूसी, वाहन विमा दुर्लक्ष तर करत नाही आहात ना, छोटासा दुर्लक्ष आणि हजारांचा दंड हे आपल्या बाबतीत होऊ शकते. कारण गोवा शासनाच्या डिजिटल तपासणी यंत्रणेमुळे आता "कागदपत्रे नंतर पाहू" हा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे गोव्याच्या सहलीचा आनंद घ्यायचा असेल तर वाहनाची सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवणेच महत्वाचे आहे.

Patradevi Check Post
Jalgaon MLC Election | विधान परिषद निवडणूक; जळगाव जिल्ह्यात आचारसंहिता लागू

महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी तपासणी नाक्यावर आता अत्याधुनिक डिजिटल तपासणी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर 'हायटेक' नजर ठेवली जात आहे. गोवा सरकारच्या 'गोवा व्हेईकल ऑथेंटिकेशन' (GOVA) प्रणालीमुळे आता वाहन तपासणीसाठी पोलिस अथवा कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित असण्याची गरज राहत नाही. कॅमेऱ्यांच्या सहाय्याने वाहन क्रमांक स्कॅन होताच वाहनाची संपूर्ण माहिती ऑनलाइन प्रणालीमध्ये तपासली जाते आणि कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास वाहनचालकांना थेट ई- चलन पाठवले जाते.

गोव्यामध्ये पर्यटनासाठी दररोज हजारो वाहने महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यांतून प्रवेश करतात. विशेषतः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, मुंबई तसेच बेळगाव, हुबळी परिसरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक स्वतःची वाहने घेऊन गोव्यात जात असतात. मात्र आता पर्यटनाच्या उत्साहात वाहनाची कागदपत्रे तपासण्याकडे दुर्लक्ष केल्यास हा प्रवास महागात पडू शकतो. कॅमेऱ्यांद्वारे तपासली जाते वाहनांची माहिती पत्रादेवीसह गोव्यातील विविध तपासणी नाक्यांवर बसविलेल्या स्वयंचलित प्रणालीद्वारे वाहन क्रमांक स्कॅन केला जातो. त्यानंतर संबंधित वाहनाचे आरसी बुक, विमा (इन्शुरन्स), प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC), परवाना यांची माहिती केंद्रीय डेटाबेसमधून तपासली जाते.

वाहनाची कागदपत्रे वैध नसल्यास काही सेकंदांत ई-चलन तयार होऊन संबंधित वाहनधारकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवला जातो. पूर्वी तपासणी नाक्यावर वाहने थांबवून प्रत्यक्ष कागदपत्र तपासली जात होती. मात्र नव्या यंत्रणेमुळे तपासणी अधिक वेगवान आणि डिजिटल झाली आहे. यामुळे नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे प्रशासनासाठी अधिक सोपे झाले आहे. १२५ रुपयांच्या पीयूसीकडे दुर्लक्ष; थेट १० हजारांचा दंड वाहनचालकांसाठी सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पीयूसी नसल्यास किंवा मुदत संपल्यास बसणारा दंड, साधारण १०० ते १५० रुपयांत होणारे पीयूसी प्रमाणपत्र वेळेत न काढल्यास तब्बल १० हजार रुपयांपर्यंत दंड बसू शकतो.

अनेक वाहनधारकांना गोव्यात प्रवेश केल्यानंतर मोबाईलवर थेट १०००० रुपयांचे ई-चलन प्राप्त झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. जर दंड बसल्यास नवीन पीयूसी काढून संबंधित विभागाकडून आलेल्या लिंक वरून माहिती भरल्यास पाठपुरावा केल्यानंतर दिलासा मिळाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. विमा नसल्यासही मोठा फटका वाहनाचा विमा वैध नसल्यास वाहनचालकांना २ ते ४ हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. त्याचबरोबर इतर वाहतूक नियमभंगही या प्रणालीतून सहजपणे शोधले जात असल्याने वाहनचालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

आता डिजिटल तपासणी प्रणालीमुळे वाहनधारकांच्या निष्काळजीपणावर मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. कारण पूर्वी प्रत्यक्ष तपासणी टाळता येत होती, मात्र आता कॅमेऱ्यांच्या नजरेतून सुटका शक्य नाही.विशेषतः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, मुंबई तसेच बेळगाव, हुबळी परिसरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक स्वतःची वाहने घेऊन गोव्यात जात असतात. मात्र आता पर्यटनाच्या उत्साहात वाहनाची कागदपत्रे तपासण्याकडे दुर्लक्ष केल्यास हा प्रवास महागात पडू शकतो.

कॅमेऱ्यांद्वारे तपासली जाते वाहनांची माहिती पत्रादेवीसह गोव्यातील विविध तपासणी नाक्यांवर बसविलेल्या स्वयंचलित प्रणालीद्वारे वाहन क्रमांक स्कॅन केला जातो. त्यानंतर संबंधित वाहनाचे आरसी बुक, विमा (इन्शुरन्स), प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC), परवाना यांची माहिती केंद्रीय डेटाबेसमधून तपासली जाते. वाहनाची कागदपत्रे वैध नसल्यास काही सेकंदांत ई-चलन तयार होऊन संबंधित वाहनधारकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवला जातो. पूर्वी तपासणी नाक्यावर वाहने थांबवून प्रत्यक्ष कागदपत्र तपासली जात होती. मात्र नव्या यंत्रणेमुळे तपासणी अधिक वेगवान आणि डिजिटल झाली आहे. यामुळे नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे प्रशासनासाठी अधिक सोपे झाले आहे.

१२५ रुपयांच्या पीयूसीकडे दुर्लक्ष; थेट १० हजारांचा दंड वाहनचालकांसाठी सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पीयूसी नसल्यास किंवा मुदत संपल्यास बसणारा दंड, साधारण १०० ते १५० रुपयांत होणारे पीयूसी प्रमाणपत्र वेळेत न काढल्यास तब्बल १० हजार रुपयांपर्यंत दंड बसू शकतो. अनेक वाहनधारकांना गोव्यात प्रवेश केल्यानंतर मोबाईलवर थेट १०००० रुपयांचे ई-चलन प्राप्त झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. जर दंड बसल्यास नवीन पीयूसी काढून संबंधित विभागाकडून आलेल्या लिंक वरून माहिती भरल्यास पाठपुरावा केल्यानंतर दिलासा मिळाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.

विमा नसल्यासही मोठा फटका वाहनाचा विमा वैध नसल्यास वाहनचालकांना २ ते ४ हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. त्याचबरोबर इतर वाहतूक नियमभंगही या प्रणालीतून सहजपणे शोधले जात असल्याने वाहनचालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. आता डिजिटल तपासणी प्रणालीमुळे वाहनधारकांच्या निष्काळजीपणावर मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. कारण पूर्वी प्रत्यक्ष तपासणी टाळता येत होती, मात्र आता कॅमेऱ्यांच्या नजरेतून सुटका शक्य नाही.

Patradevi Check Post
Air India Flights Cancelled | गोव्याच्या पर्यटनाला विमान कंपन्यांचा मोठा धक्का! जूनच्या वेळापत्रकातून एअर इंडियाच्या अनेक फेऱ्या रद्द

पर्यटकांनी काय काळजी घ्यावी ?

गोव्यात जाण्यापूर्वी वाहनचालकांनी खालील कागदपत्रांची मुदत तपासून घेणे अत्यावश्यक आहे आरसी बुक, वाहन विमा (इन्शुरन्स), पीयूसी प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, HSRP नंबर प्लेट, वाहन क्रमांक स्पष्ट असणे, विशेषतः पीयूसी आणि विम्याची मुदत संपलेली नाही ना, हे तपासूनच प्रवास सुरू करावा. अन्यथा काही मिनिटांच्या निष्काळजीपणामुळे हजारोंचा दंड भरावा लागू शकतो.

'ई-चलन' प्रणालीमुळे वाढली कारवाई

गोव्यात ई-चलन प्रणाली लागू करण्यात आली असून वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर ऑनलाईन कारवाई केली जात आहे. या प्रणालीमुळे कागदविरहित आणि पारदर्शक दंड प्रक्रिया सुरू झाली आहे. वाहन क्रमांकावर आधारित माहिती थेट परिवहन विभागाच्या डेटाबेसमधून तपासली जात असल्याने बनावट कागदपत्रे किंवा मुदत संपलेली प्रमाणपत्रे लगेच समोर येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news