Ganja Selling Arrest | गांजा विक्री करणारा घरात काढत होता झोपा, पोलिस आले अन् टाकला पहाटे छापा!

Ganja Seized By Police | कणकवलीत स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाची पहाटे 4 वा. कारवाई; संशयित ताब्यात
Ganja Selling Arrest
कणकवलीत स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाची पहाटे 4 वा. कारवाई; संशयित ताब्यातFile Photo
Published on
Updated on

कणकवली : अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून रविवारी पहाटे 4 वा.च्या सुमारास केलेल्या कारवाईत अवैधरीत्या गांजा विक्रीवर छापा टाकत संशयिताला ताब्यात घेतले. कणकवली-बांधकरवाडी येथे भाड्याच्या घरात ही गांजा विक्री केली जात होती. स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलिस पथकाने त्या घरावर छापा टाकत लपवून ठेवलेली गांजाची तब्बल 30 पाकिटे जप्त केली. तसेच शुभम ऊर्फ कुंदन संतोष गोसावी (वय 20, कणकवली-बांधकरवाडी) याला ताब्यात घेतले.

कणकवली-बांधकरवाडी येथे भाड्याने राहत असलेला एक तरुण गांजा विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहा. उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार घोन्सालवीस, एम. पी. राणे, डी. एस. डिसोजा, पी. एस. कदम, बी. पी. डिसोजा, महिला पोलिस हवालदार आर. आर. खानोलकर, कॉ. डी. जी. तवटे यांच्या पथकाने रविवारी पहाटे 4 वा.च्या सुमारास बांधकरवाडी येथे जात त्या घराजवळ सापळा लावला.

Ganja Selling Arrest
Kankavali Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशीनिमित्त कणकवलीनगरी विठ्ठलमय...!

उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी घराचा दरवाजा ठोठावून संशयित शुभम गोसावी याला उठविले. त्यानंतर घराची झडती घेतली असता, हॉलमधील एका बॅरेलमध्ये कपड्यांच्या खाली लपविलेली गांजाची तब्बल 30 पाकिटे आढळून आली. या गांजाचे वजन 380 ग्रॅम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news