Kumbhar Math incident | कुंभारमाठ येथे चिरेखाणीत पाचजण बुडाले

एका महिलेवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
mumbai drowned death
कुंभारमाठ येथे चिरेखाणीत पाचजण बुडाले Pudhari Photo
Published on
Updated on

मालवण : मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील गोवेकरवाडी रस्त्याच्या बाजूलाच असणार्‍या खाणीच्या पाण्यात आंघोळीसाठी गेलेले पाच जण बुडल्याची दुर्घटना सोमवारी सायंकाळी घडली. यात एका सोळा वर्षीय युवतीचा बुडून मृत्यू झाला तर चार जणांना वाचविण्यात यश आले. यातील एका महिलेवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

कुंभारमाठ गोवेकरवाडी येथील भानुदास लोंढे यांच्याकडे दिवाळी सणात मुंबईवरून अंजली प्रकाश गुरव (वय 30), गौरी प्रकाश गुरव (18), गौरव प्रकाश गुरव (21), करिश्मा सुनील पाटील (16), दुर्वेश रवींद्र पाटील (9) हे आले होते. हे सर्वजण सोमवारी सायं. 4 वा. दरम्यान गोवेकरवाडी लगतच्या चिरेखाणीत आंघोळ करण्यासाठी उतरले होते. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण पाण्यात बुडू लागले. हा प्रकार रस्त्यावरून जाणार्‍या राहुल भिसे या तरुणाला दिसताच त्याने तात्काळ पाण्यात उडी घेत बुडणार्‍या महिलेसह अन्य मुलांना वाचविले. मात्र यात करिश्मा पाटील ही पाण्यात बुडून बेपत्ता झाली. यात गंभीर बनलेल्या अंजली गुरव हिला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करत तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अन्य तीन मुले सुखरूप आहेत.

या घटनेची माहिती मिळताच कुंभारमाठ पोलीस पाटील विठ्ठल बावकर, आनंदव्हाळ पोलीस पाटील दशरथ गोवेकर यांच्यासह सरपंच पूनम वाटेगावकर, मधुकर चव्हाण, विकास गोवेकर, भाई टेंबुलकर, सिद्धेश गावठे, बाबी चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच भाजपच्या शहराध्यक्ष अन्वेशा आचरेकर यांनी अजित स्कुबा डायव्हिंग आणि रेहान स्कुबा डायव्हिंगच्या टीमला मदतीसाठी पाठविले. या टीमने पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या करिश्मा पाटील हिचा मृतदेह बाहेर काढला.

mumbai drowned death
Malvan Fraud News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणास लुबाडणार्‍या महिलेला अटक

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे, जितेंद्र पेडणेकर, अनुप हिंदळेकर, महिला पोलीस कर्मचारी सुप्रिया पवार, श्री. धुरी यांनी घटनास्थळी जात माहिती घेतली. बुडून मृत्यू पावलेल्या करिश्मा पाटील या मुलीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. याबाबत पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news