Rain Update : मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी काढला आदेश
Holidays Declered in sindhudurg Due To Heavy Rain
सिंधुदुर्ग येथे मुसळधार पाऊसPudhari File Photo

ओरोस, पुढारी वृत्तेसेवा : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा आणि सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मंगळवार (दि.9) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्यकार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिला आहे.

Holidays Declered in sindhudurg Due To Heavy Rain
सिंधुदुर्ग-रत्नागिरी : सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात (दि.9) आँरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. पुढील चार दिवसात जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुसूचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये मंगळवारी (दि.9) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news