Dr. Srinivas Reddy murder case | डॉ. श्रीनिवास रेड्डी खूनप्रकरणी पाचवा आरोपी गजाआड

अद्यापही चार संशयित पोलिसांच्या रडारवर
Chiplun Murder Case
चिपळूणमधील कार व्यावसायिक खून (File Photo)
Published on
Updated on

कणकवली : बंगळूर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खूनप्रकरणी बंगळूर येथे गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पाचवा संशयित आरोपी के. एन. वर्धन (20, रा. चिंकबल्लापूर, कर्नाटक, बंगळूर) याला गजाआड केले.

डॉ. रेड्डी यांचा खून के. एन. वर्धन, मधुसुदन तोकला आणि पी. बी. मन्नू या तिघांनी केला होता. या तिघांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आतापर्यंत या खूनप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, या गुन्ह्याशी संबंधित अद्यापही चार संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत.

पाचवा आरोपी के. एन. वर्धन याला कणकवली पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 10 नोव्हेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे, तर यापूर्वी पोलिस कोठडीत असलेले मधुसुदन तोकला, सुभाष सुब्बा रायाप्पा एस. आणि पी.बी.मन्नू या चौघांची पोलिस कोठडी मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. डॉ. रेड्डी यांच्या खून प्रकरणामध्ये मधुसुदन तोकला हाच मुख्य आरोपी आहे, हे सिद्ध झाले आहे. मयत डॉ. रेड्डी यांचे डेंटल मेडिकल कॉलेजसह बंगळूरमध्ये अनेक व्यवसाय आहेत. मधुसुदन आणि डॉ. रेड्डी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून व्यावसायिक संबंध आहेत. व्यवसायासाठी लागणारी आर्थिक मदत डॉ. रेड्डी यांना मधुसुदन यांनी केली होती. त्यामुळे त्या व्यावसायिक वादातूनच मधुसुदन याने डॉ. रेड्डी यांना संपवण्याचा निर्णय घेतला, असेही तपासात पुढे येत आहे.

Chiplun Murder Case
Kankavali Tree Plantation | पत्रकार संघाचा वृक्ष लागवडीचा उपक्रम स्तुत्य : उमेश तोरस्कर

डॉ.रेड्डींसह तिघांवर आहे बंगळूर येथे गुन्हा दाखल

डॉ.श्रीनिवास रेड्डी यांच्यासह तिघांवर बंगळूर येथील एका प्रकरणात आरोपींपैकी दोघांवर गुन्हा दाखल असून पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ते राज्याबाहेर आले. गोवा येथेही ते थांबले होते. त्यानंतर सिंधुदुर्गात येवून डॉ.रेड्डी यांचा मधुसुदन, के.एन.वर्धन आणि पी.बी.मन्नू यांनी खून केला.

खूनात वापरलेला चाकू घटनास्थळावरून हस्तगत

डॉ.रेड्डी यांचा खून कारमध्येच चाकूने वार करुन करण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह साळिस्ते येथे महामार्गानजीक टाकण्यात आला. त्यानंतर त्याच कारने आरोपी तिलारी येथे गेले आणि कार सोडून पसार झाले. या खूनात वापरलेला चाकू घटनास्थळावरुन हस्तगत केल्याचे पोलिस निरिक्षक तेजस नलवडे यांनी सांगितले. या प्रकरणी आणखी चार संशयित आरोपी पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. त्या आरोपींबाबत पोलिसांना माहिती मिळताच पुन्हा बंगळूर येथे पथक जावून त्या आरोपींना गजाआड करणार असल्याचे पोलिस निरिक्षक श्री. नलवडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news