BJP Internal Conflict | आजी-माजी नगराध्यक्षांत वादावादी

विशेष सभेत दोडामार्ग शहराचा प्रारूप विकास आराखडा रद्द करण्याचा ठराव; नागरी विकासाच्या मुद्यावर सत्ताधारी भाजपा सदस्यांमध्येच वाक्युद्ध
BJP Internal Conflict
दोडामार्ग : विशेष सभेत बोलताना नगराध्यक्ष चेतन चव्हाण व उपस्थित नगरसेवक, अधिकारी.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

दोडामार्ग : दोडामार्ग नगरपंचायतीच्या विशेष सभेत मंगळवारी शहराच्या प्रारूप विकास आराखड्याच्या हरकतीवरील सुनावणी बाबत नियोजन समितीने सादर केलेल्या अहवालावर चर्चा करून निर्णय घेण्याबाबत घमासान रंगले. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमताने हा आराखडा रद्द करण्याचा ठराव मंजूर केला तरी, आजी-माजी नगराध्यक्षांमध्ये झालेली शाब्दिक चकमक चर्चेचा विषय ठरली. सभागृहात शब्दांचे बाण आणि आरोपांच्या फैरी झडत असताना, नागरी विकासाच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजप मध्येच राजकारणाचा रंग चढल्याचे दिसून आले.

नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर नगराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायतचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्षांनी ठराव मंजूर करून घेतला होता. मात्र, तत्कालीन कार्यकारिणीचा कालावधी संपल्याने नगरपंचायतवर प्रशासन लागू झाले. त्यामुळे तत्कालीन बॉडीने घेतलेल्या ठरावानुसार प्रशासनाने एक स्थायी समिती नेमून नगराचा प्रारूप विकास आराखडा तयार केला.

BJP Internal Conflict
Dodamarg News | गोव्यातील अ‍ॅसिड हल्ल्याचे दोडामार्ग कनेक्शन

मात्र या आराखड्यात नगरावासियांचे हित न पाहता चुकीच्या पद्धतीने टाऊन प्लॅनिंग झाल्याचे समोर आले. या विरोधात नागरिकांनी आवाज उठविला. त्यामुळे या प्रारूप आराखड्याच्या अंतिम मंजुरी आधी नागरिकांच्या लेखी हरकती नोंदवून घेत विकास आराखड्याला नगरपंचायत बॉडीने सुद्धा विरोध दर्शविला आहे. हा आराखडा रद्द करून नव्याने दुसरा आराखडा तयार करण्यासाठी मंगळवारी नगरपंचायतमध्ये विशेष सभा घेण्यात आली. यावेळी आराखड्यामुळे होणारे नागरिकांचे नुकसान आणि वाढत्या लोकसंख्येच्या आकड्यात केलेली तफावत तसेच नगरपंचायत हद्दीतील बहुतांशी क्षेत्रात लागलेली वनसंज्ञा हटवून नव्याने आराखडा तयार करण्यास या विशेष सभेत सर्वानुमते ठराव घेण्यात आला.

सन 2011 च्या जनगणनेनुसार दोडामार्ग शहराची लोकसंख्या 3811 एवढी होती. मात्र, नगरपंचायतीची स्थापना मार्च 2015 मध्ये झाली असून यानंतर शहराच्या लेखापत्रकांत अपूर्णांक वाढ झाली. त्यानंतर 2021 मध्ये जनगणना झाली नसल्यामुळे वाढलेली लोकसंख्येचे प्रमाण निश्चित सांगता येत नाही. परंतु, करण्यात आलेला आराखडा 2011 च्या जनगणनेनुसार करण्यात आला आहे.

BJP Internal Conflict
Sindhudurg Railway News | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांच्या समस्या ऐरणीवर; गणेशोत्सवपूर्वी उपाययोजना न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा

या दशकांमध्ये झालेली लोकसंख्येची वाढ 5722 ते 6046 एवढी आहे. त्यामुळे वाढीव लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता, घरे व संपत्तीची संख्या वाढलेली आहे. तरी वाढत्या लोकसंख्येचा व लोकवस्ती क्षेत्र विचार करून नवीन किमान 3 निवासी झोन मध्ये वाढ करून याची दखल घेण्याची मागणी असेल.

या मुद्यानुसार नवीन आराखड्याची मागणी

मुख्य रस्त्याअंतर्गत निवासी झोन दाखवावा, शहरातील नाल्यालगतच्या जागेस निवासी झोन दाखवावा, बायपास रस्त्या लगत निवासी झोन दाखवावा, शहरातील नागरी वस्तीची जागा शेती झोन दाखविलेली असल्यास ती निवासी झोन मध्ये दाखवावी. विद्यमान आराखड्यामध्ये विसंगती आढळलेल्या जागाठिकाणी सुधारणा कराव्यात.

आरक्षण रद्द करणेबाबत

गट नं.202 /1 वाहनतळ आरक्षण रद्द करावे, गट नं.220/2 व 220/3 मधील शॉर्ट कॉम्प्लेक्स रद्द करावे, गट नं.137/3, 137/6 ही आरक्षणे रद्द करावीत, गट नं.245,242/4 245 मधील व्यापारी आरक्षण रद्द करावीत, सर्व्हे नं. 210/7 मधील आरक्षण रद्द करून नवीन आरक्षण द्यावे, गट नं.183/2 खेळाचे मैदान साठी नवीन आरक्षण द्यावे, गट नं.157 च्या मतदारसंघात आरक्षणाला येणार्‍या जागांचा पुनर्विचार करावा.

उशिरा का होईना, शहाणपण सुचलं! आजचा ठराव योग्यच आहे, पण आम्ही याच मुद्यावर आधीपासून जनतेला सतर्क करत होतो. विकास आराखड्याबाबत अधिकार्‍यांशी बैठक असताना हा आराखडा रद्द करण्याबाबत मी अभ्यासपूर्वक सूचना केल्या होत्या. मात्र त्या दुर्लक्षित करण्यात आल्या. आराखडा नागरिकांच्या विरोधात असल्याने त्याला विरोध केला. पण हे शहाणपण वेळेवर सुचलं असतं, तर बरे झालं असत.

संतोष नानचे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक

कोणत्याही शब्दांचा वापर करताना समजून-उमजून बोला. फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठी राजकारण जर करताय, तर शहर विकासास अडथळा ठरणारे हे फालतू राजकारण बाहेर जाऊन करा. अशा प्रवृत्तीला पदावर बसण्याची लायकी नाही.

चेतन चव्हाण, नगराध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news