Dodamarg Banner Controversy | दोडामार्ग शहरात ‘बॅनर डिप्लोमसी’!

केवळ आ. केसरकरांचे बॅनर हटवले; शिवसैनिक आक्रमक; न. पं. प्रशासनाला विचारला जाब, नगराध्यक्षांच्या मध्यस्थीनंतर बॅनर पुन्हा लावले
Dodamarg Banner Controversy
दोडामार्ग : अधिकार्‍यांना जाब विचारताना शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

दोडामार्ग : दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रातील आ. दीपक केसरकर यांच्या नावाचे होर्डिंग व बॅनर नगरपंचायतीकडून हटवण्यात आले. या कारवाईमुळे संतप्त शिंदे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयावर शुक्रवारी धडक दिली आणि अधिकार्‍यांना धारेवर धरले. यामुळे काही काळ कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी अधिकार्‍यांना होर्डिंग्ज व बॅनर पुन्हा लावण्याच्या सुचना केल्याने वातावरण शांत झाले.

दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रात अनेक होर्डिंग्ज व बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र नगरपंचायत प्रशासनाने केवळ आ. दीपक केसरकर यांचे होर्डिंग्स व बॅनर काढल्याचा आरोप करत शिंदे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीवर धडक दिली. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख प्रेमानंद देसाई, उपतालुकाप्रमुख दादा देसाई, शहरप्रमुख योगेश महाले, बाळा नाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनाही याबाबत शिवसैनिकांनी जाब विचारला.

Dodamarg Banner Controversy
Dodamarg News | गोव्यातील अ‍ॅसिड हल्ल्याचे दोडामार्ग कनेक्शन

शहरात इतर अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्स आहेत, ती का शाबूत ठेवलीत? फक्त आ. दीपक केसरकर यांचेच होर्डिंग का काढले? असा सवाल त्यांनी विचारला. या सवालांमुळे अधिकार्‍यांची बोलती बंद झाली. अधिकार्‍यांनी केवळ मार्गदर्शक तत्त्वांनुसार होर्डिंग हटवले असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनकर्त्यांचे या उत्तराने समाधान न झाल्याने ते मार्गदर्शक तत्त्वे कोणती? ते आम्हाला लेखी स्वरूपात द्या अशी जोरदार मागणी केली.

प्रशासनाकडून सूडबुद्धीने कारवाई!

आमच्या होर्डिंगसाठी स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते, ते पूर्णपणे मान्यताप्राप्त होते. असे असताना ते कशाच्या आधारावर हटवले? तुम्ही शहरातील मोबाईल टॉवर्सचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे का? ते ओके आहेत का? मग हीच कारवाई का? हा भेदभाव नाही का? प्रशासनाने सूडबुद्धीने कारवाई केली का? कारण नियम सर्वांवर सारखे लागू होतात. मग हे निवडक बॅनर हटवण्याचे कारण काय? असे अनेक सवाल करत पदाधिका़र्‍यांनी निरुत्तर केले.

Dodamarg Banner Controversy
Sindhudurg News|प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 12 सप्टेंबरपर्यंत करुळ घाट राहणार वाहतूकीसाठी बंद

अन्यथा तीव्र आंदोलन

यावेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांही आक्रमक झाल्या, ज्या ठिकाणी होर्डिंग लावण्यात आले होते, त्याच ठिकाणी ते सायंकाळपर्यंत पुन्हा लावा. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. हे राजकीय सूडबुद्धीचे लक्षण आहे. जर प्रशासन पारदर्शक असेल तर समान न्याय देणे अपेक्षित होते. होर्डिंग पुन्हा न लावल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा उपस्थित पदाधिकार्‍यांनी दिला. नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी यशस्वी शिष्टाई करत बॅनर नियमानुसार पुन्हा लावण्याच्या सूचना अधिका़र्‍यांना केल्या.

दोन वर्षाची परवानगी दोन तासात ?

दोन वर्षांपूर्वी होर्डिंगसाठी लागणारी परवानगी नगरपंचायत प्रशासनाकडे मागण्यात आली होती. त्याबाबतचे कागदपत्र ही सुपूर्द करण्यात आले होते. मात्र ती अद्याप देण्यात आली नव्हती. उलट ते काढून नेण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी शिंदेसेना आक्रमक झाली. त्यांनी या घटनेचा जाब विचारताच दोन वर्षांपूर्वी मागितलेली परवानगी दोन तासात देण्यात आली. शिवाय जाहिरात कराची रक्कम भरण्याचे पत्रही देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news