Devgad Gambling Raid | देवगडमध्ये तीन पत्ती जुगारावर छापा; ४६.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त, १४ जणांना अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पहाटे कारवाई; १४ संशयित ताब्यात
Gambling Raid
Gambling RaidPudhari
Published on: 
Updated on: 

Devgad Police Raid

देवगड : देवगड तालुक्यातील खाकशी तिठा येथील सिंधुदुर्ग सोशल स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये सुरू असलेल्या तीन पत्ती जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी पहाटे छापा टाकला. या कारवाईत १४ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, रोख रकमेसह चारचाकी व दुचाकी वाहने, मोबाईल फोन, पत्ते, टेबल-खुर्च्या असा एकूण सुमारे ४६ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग सोशल स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये तीन पत्ती जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने २ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे १.२० वाजता अकॅडमीवर छापा टाकला. त्यावेळी काही जण प्रत्यक्ष तीन पत्ती जुगार खेळताना आढळून आले, तर काही जण जुगार खेळणाऱ्यांना मदत करण्यासाठी आणि खेळासाठी तेथे उपस्थित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

Gambling Raid
Sindhudurg Crime : सावंतवाडी बस स्थानकात चोरी करणारी महिला मंठा-जालना येथून ताब्यात

या कारवाईत आदिनाथ संतोष परब (३०, जामसंडे), दीपक गुरुनाथ डगरे (३२, देवगड), प्रवीण रामचंद्र निबांळकर (४०, तळेबाजार), नाना शंकर राठोड (३०, पडेल कॅन्टीन), राजेंद्र चंद्रकांत कांबळे (५१, जामसंडे), सर्जेराव सावळा तांबे (३४, जामसंडे), योगेश विलास बाणे (४२, जामसंडे), परमेश्वर रघुनाथ शिंदे (३२, जामसंडे), अशोक गंगाराम साळस्कर (४५, वरेरी), चरण सुभाष बाणे (३१, जामसंडे), प्रकाश बाबला खरात (४७, तळेबाजार), संतोष गंगाराम साळस्कर (४६, लिंगडाळ तिठा), शार्दूल विश्वास कांबळे (२८, जामसंडे) आणि संदीप जनार्दन मालणकर (६०, सध्या सिंधुदुर्ग सोशल स्पोर्ट्स अकॅडमी, देवगड; मूळ रा. गवाणे) या १४ जणांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी या कारवाईत ३ लाख ७४ हजार ३९० रुपयांची रोख रक्कम जप्त केली. याशिवाय तीन पत्ती खेळण्यासाठी वापरण्यात येणारे पत्ते, टेबल-खुर्च्या, विविध चारचाकी व दुचाकी वाहने आणि मोबाईल फोन असा सुमारे ४६ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Gambling Raid
Sindhudurg Crime : दाभोली-मोबारवाडीत १९.७२ लाखांची चोरी

या प्रकरणी सर्व १४ संशयितांविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ मधील कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे देवगड परिसरातील जुगाराच्या अड्ड्यांविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र केल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय खाडे करीत आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news