Sindhudurg Crime : सावंतवाडी बस स्थानकात चोरी करणारी महिला मंठा-जालना येथून ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सावंतवाडी पोलिसांची संयुक्त कारवाई
Sindhudurg Crime News
सावंतवाडी बस स्थानकात चोरी करणारी महिला मंठा-जालना येथून ताब्यात
Published on: 
Updated on: 

सावंतवाडी : सावंतवाडी बसस्थानक परिसरात प्रवाशाचे तब्बल १२ तोळे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्या महिलेला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने जालना जिल्ह्यातील मंठा येथे सापळा रचून या महिलेला ताब्यात घेतले. संगीता सुभाष जाधव (३५ वर्ष, रा. संग्राम हॉटेल झोपडपट्टी, मंठा, जि.जालना) असे तिचे नाव आहे. बुधवारी तिला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला ५ दिवस पोलीस कोठडी सुनावली.

सावंतवाडी बसस्टँड परिसरातून १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण तपासले. तपासात हा गुन्हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार संगीता जाधव हिनेच केल्याचे स्पष्ट झाले होते. ताब्यात घेतल्यानंतर तिची सखोल चौकशी केली असता तिने सावंतवाडी बसस्टँड येथील दागिने चोरीची कबुली दिली. ​

ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अति. पोलीस अधीक्षक नयोमी साटम, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे आणि राजेंद्र मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहा. उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार जॅक्सन घोन्सालविस, अंमलदार अमर कांडर तसेच सहा. निरीक्षक हर्षद हिंगे, उपनिरीक्षक अविनाश पाटील, हवालदार शिंदे आणि महिला अंमलदार गावकर यांच्या संयुक्त पथकाने ही यशस्वी कारवाई केली. अधिक तपास उपनिरीक्षक अविनाश पाटील करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news