Devgad Palkhi Sohala | श्री संत सोपान काका पायी वारीचा तारामुंबरी येथे शुभारंभ
देवगड : देवगड-तारामुंबरी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर-तारामुंबरी यांच्या वतीने आयोजित श्री संत सोपान काका आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचा शुभारंभ गुरुवारी विधिवत पूजनाने करण्यात आला. 19 जून ते 7 जुलै या कालावधीत देवगड ते श्री क्षेत्र सासवड ते श्री क्षेत्र पंढरपूर या मार्गावर ही आषाढी पायी वारी पालखी सोहळा होणार आहे.
या सोहळ्याचा शुभारंभ ग्रामोपाध्ये उदय जोशी यांच्या पौरोहित्याखाली वारी संयोजक ह.भ.प. नामदेव तळवडकर व देवस्थान समिती पदाधिकारी सदस्य, मानकरी होडेकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. उद्योगपती नंदकुमार घाटे, माजी आमदार अजित गोगटे, नगरसेवक शरद ठुकरुल, तन्वी चांदोस्कर, शहर अध्यक्ष दयानंद पाटील, योगेश पाटकर, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, योगेश चांदोस्कर, वैभव करंगुटकर, रंगकर्मी विद्याधर कार्लेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
जय जय रामकृष्ण हरी, जय जय विठोबा माऊली, विठोबा रखुमाईच्या जयघोषात या पायीवरीचा शुभारंभ गुरुवारी सकाळी 9 वा. श्री विठ्ठल रखुमाई मंदिर तारामुंबरी येथे करण्यात आला. श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर तारामुंबरीचे अध्यक्ष सूर्यकांत जोशी, उपाध्यक्ष दत्तात्रय कोयंडे, कार्यवाह देविदास परब, कोषाध्यक्ष हेमंत चोपडेकर, सहकार्यवाह रवींद्र कांदळगावकर, सदस्य संदीप कांदळगावकर, आनंद उपरकर, रामचंद्र कुबल, मिलिंद कुबल, संतोष हरम तसेच अन्य समिती सदस्य, मानकरी, होडेकरी, वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या पायीवरी पालखीचे प्रस्थान तारामुंबरी, फ्रेंडस सर्कल नाका, देवगड सडा बाजारपेठ ते एसटी स्टँड मार्गे जामसंडे या मार्गावरून तळेबाजार, शिरगाव, हडपीडच्या दिशेने झाले. ठिकठिकाणी या आषाढी पायीवारीचे वारीचे उस्फूर्त स्वागत नागरिकांनी केले.

