

देवगड : देवगड तालुक्यात मंगळवारी आणि बुधवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गिर्ये व तिर्लोट येथील घरांची पडझड होऊन सुमारे लाखोंचे नुकसान झाले. पावसाच्या आगमनाने बळीराजा मात्र सुखावला आहे.
हवामान खात्याने वादळ सदृश्य स्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना सुरक्षिततेचा इशारा दिला होता. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या मच्छीमार बांधवांनी आपल्या नौका देवगड मंदिरात दाखल केल्या आहेत. त्यामुळे मासेमारी ही पूर्णतः बंद आहे. देवगड तालुक्यात सुमारे 53 मिलिमीटर इतका पाऊस झाला असून उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.