उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यापेक्षा चौपट गर्दी आमच्या मेळाव्याला होईल : दीपक केसरकर

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यापेक्षा चौपट गर्दी आमच्या मेळाव्याला होईल : दीपक केसरकर

सावंतवाडी, पुढारी वृत्तसेवा : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना केवळ सहानभूती मिळवायची आहे. ठाकरे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांपासून लांब गेलेले आहेत. हिंदू धर्माला शिव्या दिल्या जात आहेत, यावर एक शब्दही त्यांच्या तोंडातून निघत नाही. त्यामुळे त्यांच्या दसरा मेळाव्यापेक्षा चौपट गर्दी आमच्या मेळाव्याला होईल, असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. ते सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्यांविरोधात उद्धव ठाकरे यांच्याकडून एक चकार शब्दही निघत नाही. हे पाहून माझ्यासारख्या बाळासाहेबांचा आदर करणाऱ्या कार्यकर्त्याला इतके वाईट वाटत असेल. तर बाळासाहेबांना किती वाईट वाटत असेल.  मुळात शिवसेना ही माझी संस्कृती नव्हती. बाळासाहेबांच्या विचारासाठी मी तिथे गेलो होतो, अशी कबुलीही दीपक केसरकर यांनी यावेळी दिली. त्यावेळी बाळासाहेबांच्या वेळेला साधी अमरनाथची यात्रा थांबली, तर त्यांनी हजला जाणारी विमाने थांबवली. बाळासाहेबांनी सज्जड दम दिला होता, माझ्या धर्माच्या लोकांची यात्रा जर थांबत असेल. तर तुमची ही यात्रा मी होऊ देणार नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अंबरनाथची यात्रा सुरू झाली होती.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news