‘बाऊन्सर’ची मस्ती चालू देणार नाही : मंत्री केसरकर

माझ्या विरोधात बॅनरबाजी केली तरी लोक माझ्यासोबत
Deepak Kesarkar
दीपक केसरकर
Published on
Updated on

सावंतवाडी : माझ्या मतदारसंघात टेंडर मिळवण्यासाठी ठेकेदारांकडून बाऊन्सर आणून दादागिरी केली जात असेल तर ती मी मुळीच खपवून घेणार नाही, तसेच पैशांची मस्ती चालू देणार नाही. अशा कोणत्याही ठेकेदाराला मी कधीच माफ करणार नाही, असा इशारा शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी झूम पत्रकार परिषदेत दिला.

Deepak Kesarkar
शिवाजी महाराजांचा १०० फूट उंचीचा पुतळा पुन्हा उभारू : केसरकर

मतदारसंघातील लोक मला चांगले ओळखतात. मी कामे केली नसती तर जनतेने मला तीन वेळा आमदार म्हणून निवडून दिले नसते, त्यामुळे कोणीही बॅनरबाजी केली तरी मला फरक पडत नाही, लोक माझ्यासोबत आहेत, असा दावा ना. केसरकर यांनी केला.

...तर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल स्थलांतरित करण्याशिवाय पर्याय नाही

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि सावंतवाडी बस स्थानक ही माझ्या आश्वासनातील दोन कामे शिल्लक आहेत. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याबाबत सावंतवाडी राजघराण्याच्या काही सह्या शिल्लक राहिल्या असल्याने वेळ लागत आहे. येत्या दोन दिवसांत त्यावर सह्या न झाल्यास हे स्पेशालिटी रूग्णालय दुसरीकडे स्थलांतरित करण्याशिवाय पर्याय नाही. तर रखडलेल्या सावंतवाडी एसटी स्थानकाचे काम हे बीओटी तत्त्वावर लवकरात लवकर सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Deepak Kesarkar
आता शाळा, वसतीगृहात पॅनिक बटण असेल; दीपक केसरकर यांची माहिती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news