आठ वर्षीय मुलाचा मृत्‍यू, संतप्त नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, रूग्णालयाच्या काचा फोडल्या

वैभववाडी रूग्णालयात घडली घटना.
sindhudurg crime news
आठ वर्षीय मुलाचा मृत्‍यू, संतप्त नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, रूग्णालयाच्या काचा फोडल्याfile photo
Published on
Updated on

Death of an eight-year-old boy, angry relatives beat up a doctor, broke the windows of the hospital

वैभववाडी : पुढारी वृत्तसेवा

आठ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण करत रुग्णालयाच्या काचा फोडल्या. ही घटना वैभववाडी रुग्णालयात रविवारी रात्री ८.३० वाजता घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरिक्षक घटनास्थळी दाखल झाले.

sindhudurg crime news
शिकरीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागून जागीच मृत्यू, तर दुसरा गंभीर

कोकीसरे नारकरवाडी येथील शिवांश तानवडे (वय 8) हा मुलगा आजारी असल्याने नातेवाईकांनी त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात, रविवारी सायंकाळी दाखल केले. दाखल करण्यापूर्वी त्याची प्रकृती चिंताजनक होती. वैद्यकीय अधिकारी मोरे यांनी काही वेळातच मुलगा मयत झाल्याचे नातेवाईकांना सांगितले.

मुलाच्या वडिलांचा राग अनावर आल्याने त्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे यांच्या कानशिलात लगावली व रुग्णालयाच्या दरवाजाच्या काचा फोडल्या. या घटनेची माहिती मिळताच इतर नातेवाईकांनी व नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. पोलिसी घटनास्थळी दाखल झाले. 

sindhudurg crime news
Kumbhar Math incident | कुंभारमाठ येथे चिरेखाणीत पाचजण बुडाले

उशिरापर्यंत नातेवाईकांवर गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता. घटनास्थळी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर तसेच पोलीस कर्मचारी दाखल झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news