Sindhudurg Politics Update | भाजप जिल्हाध्यक्ष स्वतःला न्यायाधीश समजत आहेत का? दत्ता सामंत

Sindhudurg Politics Update
मालवण: येथील शिंदे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. Pudhari Photo
Published on
Updated on

मालवण: ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपच्या एका पदाधिकार्‍याच्या घरात काल मोठी रक्कम आढळून आली. या सापडलेल्या रकमेची चौकशी संबंधित यंत्रणेने करावी, अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी केली होती. मात्र, यावर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी जे उत्तर दिले, त्यावरून ते स्वतःला न्यायाधीश समजत आहेत काय, असा सवाल शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

मालवण येथील शिंदे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी सभापती सुनील घाडीगावकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, राजन परुळेकर, दीपक पाटकर उपस्थित होते. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्या जात प्रमाणपत्राचा विषय आमदार निलेश राणे यांनी न्यायालयात नेला आहे.

तो विषय न्यायप्रविष्ट असतानाही भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी तो निकाली काढल्याचे वक्तव्य केले आहे. आमदार निलेश राणे सुसंस्कृत आहेत. त्यांनी अर्वाच्च भाषेत न बोलता पोलिसांना आणि प्रसार माध्यमांना बोलावून पैशाची बॅग दाखवून दिली. पैसा सापडल्यानंतर जे भाजपचे पदाधिकारी तिथे दिसले, ते फ्लॅटचे पैसे द्यायला गेले होते की त्यांचा चालक रूम घ्यायला गेला होता, याचा खुलासा भाजप जिल्हाध्यक्षांनी करायला हवा होता.

ते पदाधिकारी नेमके कशासाठी गेले होते तसेच ते आढळून आलेले पैसे कसले आहेत, हे जनतेला माहीत आहे. या सर्व घडामोडीनंतर आमदार निलेश राणे यांना चक्रव्यूहात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचे काम आणि व्हिजन जनतेला माहीत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

Sindhudurg Politics Update
Sindhudurg First District Naming Under Constitution | वाड्यावस्त्यांना संविधानाच्या अधिन नावे देणारा सिंधुदुर्ग पहिला जिल्हा

आम्ही लोकशाही मार्गाने निवडणूक लढवत आहोत. भाजप जिल्हाध्यक्षांनी अशा गोष्टी करू नयेत. सत्तेत बहुमतात असल्याचा गैरसमज कोणी करून घेऊ नये आणि सत्तेत असला म्हणून कोणालाही धमकी देऊ नये,“ असे सामंत म्हणाले. राज्यात भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे हे महायुतीचे घटक आहेत. त्यामुळे तत्वाने भांडले पाहिजे.

Sindhudurg Politics Update
Sindhudurg news : ई-पीक पाहणी नोंदणीत अडचणी; अट शिथिलतेची मागणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news