

दशावतारी कलाकारांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
दशावतार कलावंतांचा लवकरच जिल्हास्तरीय मेळावा घेणार
कलेत नावीन्य आणा, पण मूळ गाभा हरवू नका
कुडाळ : दशावतार कलावंतांनी आपली पारंपरिक कला लयास जाणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून आणि आ. नीलेश राणे यांच्या प्रयत्नांतून दशावतार लोककलेला राजाश्रय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी लवकरच जिल्ह्यातील सर्व दशावतार कलाकारांचा जिल्हास्तरीय मेळावा कुडाळ येथे घेतला जाईल, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ‘माझा लोकराजा’ महोत्सवात केले. यावेळी सादर झालेल्या कुडाळ तालुक्यातील दशावतार कलाकारांच्या ‘रक्तपिसासू रक्ताक्षी’ नाट्यप्रयोगाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिरात सोमवारी सायंकाळी ‘माझा लोकराजा महोत्सव- 2025 ’ झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र भांड, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेविका चांदणी कांबळी, प्रा.अविनाश वालावलकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकर, जिल्हा पारंपरिक दशावतार कलाकार संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळू कोचरेकर, दत्तप्रसाद शेणई, सिद्धेश कलिंगण, पखवाज अलंकार महेश सावंत, कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे विलास उर्फ बाळा राऊळ, निलेश कुडाळकर व महेश मडवळ, लाजरी क्रिकेट ग्रुपचे स्वरूप सावंत आदींसह जिल्ह्यातील दशावतार कलाकार, गुणवंत विद्यार्थी व नाट्यरसिक उपस्थित होते.
दत्ता सामंत म्हणाले, दशावतार कला जिवंत राहिली पाहिजे. काही काळ या कलेने वाईट दिवस पाहिले आहेत, पण आता पुन्हा एकदा या कलेला बहर आला आहे. नवे कलाकार यामध्ये येत आहेत. पण कलावंतांनी पारंपारिक दशावतार कला आहे ती जोपासली पाहिजे. ट्रिकसिन किंवा इतर गोष्टी करायला विरोध नाही पण जो पारंपारिक कलेचा गाभा आहे तो लयास जाऊ देऊ नये.
दशावतारी कलाकारांचे प्रश्न आ. नीलेश राणे यांनी हाती घेतले आहेत. ते सोडविल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत. यासंदर्भात त्यांनी सांस्कृतिक व कला चे सुपूत्र आहेत. त्यामुळे निश्चित या कलेला राजाश्रय मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. अविनाश वालावलकर यांनी दशावतार कलेला लोकाश्रय आहे परंतु राजाश्रय मिळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे सांगून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ दशावतार कलाकार स्व. महादेव लोट कुटुंबिय व दशावतारातील ज्येष्ठ पखवाज वादक स्व. अशोक नेरुरकर यांच्या कुटुंबियांचा तसेच ज्येष्ठ कलाकार सुरेश धुरी (माणगाव), ज्येष्ठ हार्मोनियम वादक प्रकाश आकेरकर (आवेरे) व पंढरीनाथ सामंत (आंदुर्ले) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दहावी - बारावी परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
यामध्ये इ. 10 वी - संकल्प रेवंडकर (चेंदवण), सार्थक सावंत (माणगाव), चिन्मय बांदेकर (चेंदवण), शर्मिला धुरी (वाडीवरवडे), मैत्रेय पालव (जांभवडे), वैष्णवी मांजरेकर (आंदुर्ले), सुरज गावडे (आंदुर्ले), प्रणय सावंत (माणगाव), शांभवी नाईक (नेरुर), चंदन गरुड (पिंगुळी), वैष्णवी परब (आंदुर्ले), सानिका सावंत (आंदुर्ले), युवराज निवतकर (गोवेरी). इयत्ता बारावी - मनिष मेस्त्री (नेरुर), चेतन तांडेल (कुडाळ), तन्वी हळदणकर (झाराप), साक्षी मोर्ये (मोरे), यशस्वी लाड (घावनळे) या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन हरेश नेमळेकर यांनी तर सन्मानपत्र वाचन मोरेश्वर सावंत यांनी केले. आभार विघ्नराजेंद्र कोंडूरकर यांनी मानले.