

वेंगुर्ला ःभाजपचे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार यांनी एकदिलाने प्रचारात उतरून काम करा. भाजपने केलेले काम नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वेंगुर्ले येथे केले. वेंगुर्ले भाजप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांशी चर्चा करून प्रचाराचा आढावा घेतला. पालकमंत्री नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी,भाजपा युवा नेते विशाल परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष विष्णू ऊर्फ पप्पू परब, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप उर्फ राजन गिरप, साईप्रसाद नाईक, जयंत मोंडकर, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, महिला जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे, नगरसेवक पदाचे उमेदवार मंजुषा आरोलकर, रवी शिरसाट, गौरी माईणकर, प्रीतम सावंत, विनायक गवंडळकर, गौरी मराठे, आकांक्षा परब, तातोबा पालयेकर, सुषमा प्रभूखानोलकर, विनय नेरूरकर, रिया केरकर, सदानंद गिरप, काजल गिरप, सचिन शेट्ये, श्रेया मयेकर, प्रसाद गुरव, युवराज जाधव, यशस्वी नाईक, प्रणव वायंगणकर, शीतल आंगचेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा हा राज्यातील बलवंत पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दशकभरात गोरगरीब जनतेसाठी व इतर सर्व घटकासाठी राबविलेल्या योजना आपल्या विजयासाठी पुरेशा आहेत. त्या प्राधान्याने जनतेसमोर न्या. वेंगुर्ला नगरीत आपल्याला निर्विवाद यश मिळवायचे असून वेंगुर्ला शहराला पुन्हा देशपातळीवर चमकावयाचे आहे. त्यासाठी सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पक्षाची शिस्त पाळून काम करा व जनतेपर्यंत जा, असे आवाहन ना. रवींद्र चव्हाण यांनी केले.