

सावंतवाडी : गोवंशसद़ृश मांसाची वाहतूक करताना सापडलेल्या वाहनावर पोलिसांनी माजगाव येथे कारवाई करत दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. कर्नाटक ते गोवा अशी ही गोमांसाची वाहतूक होत होती.
महिंद्रा झायलो वाहनातून गौस मुजावर (वय 37, रा. म्हापसा, गोवा) व रबानी भंडारी (30, रा. हनगल, कर्नाटक) हे दोन संशयित गोवंशसद़ृश जनावराचे सुमारे 290 किलो मांस विनापरवाना वाहतूक करत होते. माजगाव गोठणेश्वर येथे पोलिसांनी नाकाबंदी केली असता आंबोलीकडून आलेल्या चारचाकीची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी पोलिसांनी दोघांवरही गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाच्या मार्गांवर अचानक नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.