Banda Police Liquor Raid | बांद्यात 4 लाखांच्या गोवा दारूसह कार जप्त

Banda Police Liquor Raid | रत्नागिरी-राजापूर येथील तरुण ताब्यात
Banda Police Liquor Raid
Banda Police Liquor Raid
Published on
Updated on

बांदा : पुढारी वृत्तसेवा

बांदा पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करत गोवा दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनासह एकूण ११ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील गोवा दारूची किंमत अंदाजे ४ लाख ८ हजार रू. आहे. या प्रकरणी प्रशांत रवींद्र जाधव (वय ३३, रा. बौद्धवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Banda Police Liquor Raid
Ratnagiri Shivbhojan Thali | शिवभोजन केंद्रांसाठी जिल्ह्याला दीड कोटी मंजूर

ही कारवाई रविवारी पहाटे बांदा तपासणी नाका येथे करण्यात आली. ही दारू राजापूर-अणुस्कुराघाटमार्गे कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रात नेली जात असावी, असा संशय पोलिसांना आहे.

रविवारी पहाटे सुमारे ३.३० वा. च्या सुमारास तपासणी नाक्यावर वाहनांची नियमित तपासणी सुरू होती. यावेळी गोव्याहून येणारी चारचाकी (क्र. एमएच ४३ एन २३३९) ही गाडी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान गाडीमध्ये गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूचे बॉक्स आढळून आले.

Banda Police Liquor Raid
Rajapur Gram Panchayat | राजापूरचा गावगाडा तापणार! 15 ग्रामपंचायतींच्या 21 जागांसाठी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले

स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना दारूची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी संशयित प्रशांत जाधव याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत एकूण HOTD १,४५२ दारूच्या बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ४ लाख ८ हजार रुपये असून ७ लाख रुपये किमतीची चारचाकी असा मिळून एकूण ११ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. पुढील तपास बांदा पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news