

बांदा : इन्सुली-बिलेवाडी येथील शाळा क्र. 7 जवळील शेतात गुरुवारी सकाळच्या सुमारास एक गंभीर घटना घडली. शेतात काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह असलेली वीजवाहिनी शेतकर्याच्या पॉवर टिलरवर कोसळली. मात्र प्रसंगावधान राखल्यामुळे शेतकरी शैलेश कोठावळे हे बांलबाल बचावले.
घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जीर्ण वीज खांब तसेच विद्युत वाहक तारांबाबत महातिवरण दुर्लक्ष करत असल्याने अशा जीवघेण्या घटना घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील जीर्ण कंडक्टर आणि खांब 15 ऑगस्टपर्यंत न बदलल्यास, तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.