केसरकरांनी जर्मनीच्या गोष्टी सांगून तरुणांची दिशाभूल करू नये!

आशिष सुभेदार यांचा दीपक केसरकरांना टोला
Ashish Subhedar
आशिष सुभेदार
Published on
Updated on

सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना जर्मनीमध्ये रोजगार देण्याची घोषणा करणार्‍या दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील वेरेनियम कंपनीने फसवणूक केलेल्या 210 कर्मचार्‍यांचे पगार मिळण्यासाठी आणि त्यांना नव्याने रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. नाहक जर्मनीच्या गोष्टी सांगून त्यांची दिशाभूल करू नये, असा टोला सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी लगावला आहे.

Ashish Subhedar
आता शाळा, वसतीगृहात पॅनिक बटण असेल; दीपक केसरकर यांची माहिती

सावंतवाडी मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याठिकाणी रोजगार नसल्यामुळे अनेक युवकांना जिल्ह्याबाहेर काम करावे लागत आहे. गोव्यासारख्या ठिकाणी येत असताना अपघात होऊन अनेक युवक मृत्यू पडत आहेत. त्यामुळे ऐन उमेदीच्या काळात अनेकांना आपली मुले गमवावी लागली आहेत.त्यामुळे मातापित्यांचे शिव्या शाप घेण्यापेक्षा त्याठिकाणी रोजगार उपलब्ध करून लोकांचे आशीर्वाद घ्यावेत. नाहक कोटीच्या घोषणा करून किंवा रोजगार आणण्याच्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करू नये. अन्यथा येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही. वेरेनियम कंपनी ही दीपक केसरकर यांनीच आणली होती. त्या कंपनीचे मुख्य संचालक हे केसरकर यांचे मित्र होते. त्यांना सिंधुरत्नमधून अनेक ठेके देण्यात आले होते. मात्र आता कर्मचार्‍यांची फसवणूक झाल्यानंतर यावर काहीच बोलण्यासाठी केसरकर तयार नाहीत, त्यामुळे मुलांच्या होणार्‍या नुकसानास जबाबदार कोण याचे उत्तर केसरकरांनी द्यावे, असे सुभेदार यांनी म्हटले आहे.

Ashish Subhedar
शिवसेनेच्या ‘त्या’ १६ आमदारांना आमचा व्हीप पाळावा लागेल : दीपक केसरकर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news