आडेलीत 18 फुटी लाल भेंडीचे झाड!

डॉ.अनंत प्रभूआजगावकर यांच्या कामगिरीची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद
Sindhudurg news
आडेलीत 18 फुटी लाल भेंडीचे झाड!Pudhari Photo
Published on
Updated on

वेंगुर्ले : अजय गडेकर

वेंगुर्ले तालुक्यातील आडेली-गोपीनाथवाडी येथील रहिवासी डॉ. अनंत दिगंबर प्रभूआजगावकर यांनी लाल भेंडीचे झाड 17 फूट 10 इंच इतके उंच विकसित करून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. कृषी क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीची ‘वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे. याबद्दल त्यांचे कृषी क्षेत्रासह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Sindhudurg news
विक्रमवीर बुमराह ठरला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’! जाणून घ्या रेकॉर्ड आणि आकडेवारी

गेली 22 वर्षे कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. आजगावकर यांनी लाल भेंडीची जात स्वतः विकसीत केली आहे. ही जात विकसित करण्यासाठी त्यांना 6 वर्षे कालावधी लागला. सध्या हे झाड 9 महिने वयाचे असून याचे आयुष्य सुमारे दीड वर्षे असल्याचे डॉ. आजगावकर सांगतात. या झाडावर सध्यस्थितीत 150 भेंडी लागली असून पुढील कालावधीत किमान 400 ते 500 भेंडी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या जातीच्या केवळ बियापासून झाड तयार होत नाही, तर त्यांनी सहा वर्षे कठोर परिश्रम घेऊन भेंडीचे झाड डोळे व कलम पद्धत वापरून विकसित केले आहे. पुढील कालावधीत 21 ते 22 फुटापर्यंत हे झाड विकसित करण्याचा मानस डॉ. आजगावकर यांचा आहे.

Sindhudurg news
''वाईल्ड फायर है'' 'Pushpa-2', एक हजार कोटी कमवून रेकॉर्ड तोडायला तयार

ग्रामस्थ व कुटुंबियांकडून मोलाचे सहकार्य

सावंतवाडी तालुक्यातील आजगाव हे डॉ.आजगावकर यांचे मूळ गाव आहे. आजगावकर हे आपल्या पारंपारिक शेती व आंबा, काजू, नारळ बागायतीत कृषी क्षेत्रातील विविध उपक्रम राबवत असतात. कृषी शास्त्राचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते गेली 22 वर्षे कृषी क्षेत्रात कार्यरत आहे. या संशोधनकामी आपणास माजी मंत्री तथा माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य व वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले. त्यामुळेच आपण ‘वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये पात्र ठरू शकलो, असे ते सांगतात. आपले सहकारी विनोद राऊळ, रमेश राऊळ, गितेश शेणई, मंगेश सावंत, पत्नी अनिता व मुलगा अंकित आदी कुटुंबीयांचेही मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे डॉ.आजगावकर यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news