

सावंतवाडी : स्वातंत्र्य दिनी सकाळी आंबोली घाटात एक मोठे झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सकाळी 6.45 वा.च्या सुमारास ही घटना घडली. आंबोली घाटातील कुंभेश्वरजवळ एक मोठे झाड मुख्य महामार्गावर कोसळले. त्यामुळे दोन्ही बाजूंकडील वाहतूक थांबली. 15 ऑगस्टची सुट्टी असल्याने अनेक पर्यटक आंबोलीकडे जात होते, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
घटनास्थळी बांधकाम विभाग आणि पोलिस तातडीने पोहोचले. त्यांनी झाड बाजूला करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर काही वेळाने वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.