

वेंगुर्ले : सावंतवाडी विधानसभा मतदार सघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारानिमित्त उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा नेते तथा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची वेंगर्लेमध्ये सभा होणार आहे.
रविवारी (दि.१७) सायंकाळी ७ वाजता ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, उमेदवार राजन तेली व अन्य पक्ष पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभेला तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब व शहरप्रमुख अजित राऊळ यांनी केले आहे.