Leopard Spotted | आडाळी एमआयडीसी परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे बुधवारी दिवसाढवळ्या एका बिबट्याचे दर्शन झाले. येथील काही युवक प्रवास करत असताना हा बिबट्या दिसून आला.
आडाळी एमआयडीसी परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन
आडाळी : येथील एमआयडीसी परिसरात रस्त्यावर दिसलेला बिबट्या.File Photo
Published on
Updated on

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे बुधवारी दिवसाढवळ्या एका बिबट्याचे दर्शन झाले. येथील काही युवक प्रवास करत असताना हा बिबट्या दिसून आला. दिवसाढवळ्या बिबटा दिसल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मोरगाव परिसरातील काही युवक बुधवारी सकाळी कारने प्रवास करत होते. त्यांची कार आडाळी एमआयडीसीजवळ पोहोचताच रस्त्याच्या मध्यभागी एक बिबट्या उभा असल्याचे त्यांना दिसून आले. अचानक समोर बिबटा दिसताच वाहनचालकाने गाडी थांबवली. काही क्षण कारसमोरच उभा राहिलेल्या बिबट्याचे त्यांनी फोटो तसेच व्हिडीओ चित्रीकरण केले.

आडाळी एमआयडीसी परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन
Dodamarg Banner Controversy | दोडामार्ग शहरात ‘बॅनर डिप्लोमसी’!

वाहन थांबल्याचे लक्षात येताच बिबट्या काही क्षण स्थिर राहिला आणि नंतर जंगलाच्या दिशेने धूम ठोकत अद़ृश्य झाला. दिवसाढवळ्या बिबट्या रस्त्यावर दिसल्याची घटना ऐकून पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी याच बिबट्याचे कुंब्रल परिसरातही दर्शन झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे आडाळीत दिसलेला बिबट्या तोच असावा, असा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news