मैत्रीणीच्या वादामुळे मालवणमधील युवकाला कुडाळमध्ये मारहाण

चार तरुणांना पोलिसांकडून अटक
A youth in Malvan was beaten with a spade due to a dispute with his girlfriend
मैत्रीणीच्या वादामुळे मालवणमधील युवकाला कुडाळमध्ये मारहाणPudhari Photo
Published on
Updated on

कुडाळ : महाविद्यालयातील एका मैत्रिणीच्या वादातून मालवण रेवतळे येथील मॅक्वीन मारी फर्नाडिस (वय.20) याला कुडाळ येथील एसआरएम कॉलेज चौकात मारहाण करण्यात आली. या प्रकरणी कुडाळ शहर परिसरातील चौघांना कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या चौघांना कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे. महाविद्यालयातील एका वादातून वैभव मनोज कांबळी (रा. लक्ष्मीवाडी कुडाळ), रोहन महेश शिरसाट (रा. उद्यमनगर कुडाळ), प्रज्वल नितीन सावंत ( रा. वेताळबांबर्डे कुडाळ), सुरज दिपक राऊळ ( 22,नाबरवाडी कुडाळ ) या चौघांनी एसआरएम कॉलेज परिसरात या मालवण येथील युवकाला मारहाण केली.

A youth in Malvan was beaten with a spade due to a dispute with his girlfriend
कल्याण रेल्वे स्थानकात सुट्ट्या पैशांवरून महिला कर्मचाऱ्याला मारहाण

यातील वैभव कांबळी याने फर्नाडिस याला रोहन शिरसाट याच्या स्कुटीवर बळजबरीने बसण्यास सांगितले व यावेळी प्रज्वल सावंत हा मागे बसुन त्याने एका मैत्रिणीला माझ्याबद्दल काय बोलतो, तुला सांगतो असे म्हणत स्कुटीने एसआरएम कॉलेज येथून तहसिल परिसरातील गार्डन परिसरात नेले. यावेळी सातत्याने हाताच्या थापटाने मारहाण केली गार्डनकडे गेल्यावर वैभव कांबळी, रोहन शिरसाट व प्रज्वल सावंत व अन्य एकाने हाताच्या थापटाने मानेवर, पाठीवर मारहाण केली. रोहन शिरसाट याने लाकडी दांड्याने फर्नाडिस याच्या पायावर मारहाण केली तसेच इतर दोन अनोळखी व्यक्तींनीही येवून फर्नाडिस याला मारहाण केली. वैभव कांबळी याने शिवीगाळ करून त्या मुलीची माफी मागायला लावली व हातपाय तोडुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी या चौघांनाही कुडाळ पोलिसांनी अटक केली. या घटनेची फिर्याद मॅक्वीन मारी फर्नाडिस याने कुडाळ पोलिसात दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश कराडकर करीत आहेत. अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news