Anganewadi Yatra : आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी जिल्ह्यातून १४५ एसटी बस | पुढारी

Anganewadi Yatra : आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी जिल्ह्यातून १४५ एसटी बस

कणकवली; पुढारी वृत्तसेवा : मसुरे-आंगणेवाडी येथे होणाऱ्या श्री भराडी देवीच्या यात्रेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्याच्या विविध आगारांतून आणि वाडी-वस्तीवरून १४५ बस सोडण्यात येणार आहेत. रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांनाही एसटी बस सेवा दिली जाईल, अशी माहिती एसटीचे विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी दिली. (Anganewadi Yatra)

भराडी देवीच्या यात्रेसाठी (Anganewadi Yatra) लाखो भाविकांची गर्दी होते. यंदा २ मार्चला ही यात्रा होत असून एसटीच्या वतीने १ ते ३ मार्चपर्यंत बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्या वतीने १ तारखे पासून रात्री १० वाजता बस सेवा सुरू होत आहे. २ आणि ३ मार्चला कणकवली रेल्वे स्टेशन ते कणकवली आगार तसेच मालवण आणि आंगणेवाडी येथे जाणाऱ्या प्रवासासाठी थेट एसटी बस सेवा देण्यात आली आहे. कुडाळ आगारामधूनही २ ते ३ मार्चला कुडाळ ते आंगणेवाडी परिसरातील प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. याचबरोबर कुडाळ ते आंगणेवाडी २२ गाड्या, कसाल हिवाळेमार्गे आंगणेवाडी ४ गाड्या, कसाल खोटले ते आंगणेवाडी ५ गाड्या, निरुखे, पांग्रड ते आंगणेवाडी ३ गाड्या, पणदूर, ओरोस ते आंगणेवाडी एक गाडी अशा कुडाळ येथून ३५ गाड्या धावतील. (Anganewadi Yatra)

मालवण तालुक्यातील मालवण ते आंगणेवाडी २० गाड्या, टोपीवाला हायस्कूल ते अंगणेवाडी ३ गाड्या, देवबाग तारकर्ली ते आंगणेवाडी ४ गाड्या, आनंदव्हाळ ते आंगणेवाडी, डांगमोडे ते आंगणेवाडी, सर्जेकोट ते आंगणेवाडी, मालोंड ते आंगणेवाडी प्रत्येकी १ बस गाडी, मसुरे ते आंगणेवाडी ६ गाड्या, चौके, देवली, आंबेरी ते आंगणेवाडी २ गाड्या, देवली ते वायरी मार्गे आंगणेवाडी १ गाडी, वराड ते आंगणेवाडी, तळगाव, सुकळवाड मार्गे आंगणेवाडी, तिरवडे, मसुरे मार्गे आंगणेवाडी प्रत्येकी २ गाड्या, कट्टा, कुणकवण ते आंगणेवाडी १ गाडी, धामापूर ते आंगणेवाडी २ गाड्या अशा एकूण मालवण तालुक्यातून ४९ बसगड्या धावणार आहेत. कणकवली आगारातून कणकवली ते आंगणेवाडी ३९ गाड्या, अजगणी, आसरोंडी मार्गे आंगणेवाडी २ अशा ४१ गाड्या सोडण्यात येणार आहेत. देवगड तालुक्यातील देवगड आगार ते आंगणेवाडी २, आचरा ते आंगणेवाडी ४, हिंदळे, मुणगे ते आंगणेवाडी ३ गाड्या, तर तोंडवली, तळाशील ते आंगणेवाडी, कुडोपी ते आंगणेवाडी, आरे, निरोप ते आंगणेवाडी, आचरा, चिंदर, त्रिंबक, बांदीवडे ते आंगणेवाडी प्रत्येकी १ गाडी अशा एकूण १३ गाड्या धावणार आहेत. विजयदुर्ग आगारातून विजयदुर्ग आंगणेवाडी ५ गाड्या तर वेंगुर्ले आगारातून पाट, परुळे-आडारी मार्गे ते आंगणेवाडी अशा २ बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांमधून नियमित सवलतही प्रवाशांना मिळणार आहे. (Anganewadi Yatra)

Back to top button