Sindhudurg News: मेडिकल कॉलेज, रुग्णालयांतील गैरसोयीवरून पालकमंत्र्यांकडून अधिकारी धारेवर

Sindhudurg News: मेडिकल कॉलेज, रुग्णालयांतील गैरसोयीवरून पालकमंत्र्यांकडून अधिकारी धारेवर

ओरोस, पुढारी वृतसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेबाबत येत असलेल्या बातम्या मी वाचतो. त्यात तुमच्यात समन्वय नाही, लोकप्रतिनिधी व रुग्णांकडून होणार्‍या तक्रारीच्या अनुषंगाने या आढावा बैठकाचे आयोजन केले आहे. त्यामुळे तुम्ही माझ्याशी बोलता एवढं लक्षात ठेवा, मी लोकांसाठी बोलतोय, असा सूचक इशारा देत न होणाऱ्या समस्या मांडून दिशाभूल करू नका, असा सज्जड इशारा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. Sindhudurg News

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्याच्या वाढत्या समस्या आणि जनतेच्या व लोकप्रतिनिधींच्या वाढत्या तक्रारी पाहता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज (दि.२९) सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता यांच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, भाई सावंत, जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील, डॉ. श्याम पाटील आदींसह वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. Sindhudurg News

पालकमंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, आपल्याला अद्ययावत आरोग्य यंत्रणा करायची आहे. रुग्णांच्या वाढत्या तक्रारी बाबत रिक्त पदांचा प्रश्न आपण जिल्हास्तरावर नावीन्य पूर्ण योजनेतून कंत्राटी भरती करून महाराष्ट्रासमोर नवा आदर्श घालून देऊ, यासाठी निधी कमी पडणार नाही. चुकीची माहिती देऊ नका, जे होणार नाही ते मांडण्यापेक्षा जे होणार आहे, तेच मला सांगा, अशा सुचना अधिष्ठाता डॉ. सुनिता रामानंद यांना देऊन जिल्हाधिकारी यांना आरोग्य यंत्रणेबाबत जबाबदारीने आढावा घ्या, अशा सूचना त्यांनी केल्या.

जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेबाबत कोणतीही तक्रार खपवून घेतली जाणार नाही. तुमच्यातील असलेले अंतर्गत वाद मिटवा. औषध तुटवड्याबाबत मला प्रत्येक आठवड्याला आढावा द्या. जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाबाबत जबाबदारी घ्यावी, अशा सूचना चव्हाण यांनी केल्या. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुनिता रामानंद यांनी शासकीय रूग्णालयातील रुग्ण सेवेचे आलेखाद्वारे सादरीकरण केले.

Sindhudurg News  शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची माहिती दया

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे पत्त्यासह यादी तयार करा. रुग्णालयातील पॅथॉलॉजीमध्ये तातडीने कंत्राटी पद्धतीवर भरती करा, अशी भरती जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत सुरू करा, निधी कमी पडू देणार नाही, असेही पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले.

पालकमंत्री चव्हाण – अधिष्ठाता डॉ. सुनीता रामानंद यांच्यात शाब्दिक चकमक

या बैठकी दरम्यान पालकमंत्री चव्हाण व अधिष्ठाता डॉ. सुनीता रामानंद यांच्यात माहिती देण्यावरून शाब्दिक चकमक उडाल्याची पाहायला मिळाले. तुम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काय होणार नाही, याची माहिती देण्यामध्ये अग्रेसर आहात, असे पालकमंत्री चव्हाण यांनी अधिष्ठाता डॉ. सुनिता रामानंद यांना सुनावले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news